
शशिकांत हिंगोणेकर शिवांजली साहित्य पुरस्काराने सन्मानीत
शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी ता. जुन्नर जि. पुणे ही साहित्य संस्था दरवर्षी मराठी साहित्य महोत्सव आयोजीत करीत असते. पंचवीस घरे असलेल्या छोट्याशा वाडीत कवीमित्र श्री. शिवाजी चाळक यांनी साहित्यप्रेमी मित्रांच्या सहकार्याने शिवाजंली शैक्षणिक संकुलाची स्थापना ग्रामीण भागात साहित्य आणि शैक्षणिक चळवळ रुजावी यासाठी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील छोट्याशा वाडीत अशाप्रकारे काम करणारी. ही एकमेव संस्था आहे.या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध साहित्य पुरस्कार दिले जात असतात. २५फेब्रूवारी ते २७फेब्रूवारी या दरम्यान साहित्याचे आणि लेखकांचे लेखन आणि चिंतन महोत्सव याठिकाणी संपन्न होतोय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांचे शुभहस्ते २६फेब्रूवारीला हे पुरस्कार वितरीत होत आहे. खान्देशातून कवितेचा श्री. दत्तात्रय वडगावकर पुरस्कृत शिवांजली साहित्य सन्मान काव्य पुरस्कार कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे “अंतर्बाह्य” या कवितासंग्रहाला दिला जातोय. ही खान्देशासाठी अभिमानाची बाब आहे.सन्मान चिन्ह,सन्मानपत्र आणि दोन हजार रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील कवी केशवसुत या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक साहित्य संस्थांचे पुरस्कारांनी शशिकांत हिंगोणेकर सन्मानित आहेत. कविता ही केवळ लिहिण्यासाठी ते लिहित नाहीत. तर कवितेतून अंतर्मुख करणारे समाजचिंतन आणि प्रबोधन करणे आणि अनुभवातून सच्चेपणाने लिहिणे. हे त्यांच्या कवितेचे विशेष आहे. या पुरस्कारा निमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.