


प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने 5 कोटी च्या रस्त्याचे भूमिपूजन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्रभाग क्र.9 मध्ये मा. आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचा प्रयत्नाने 5 कोटी चा रस्त्याचे भूमिपूजन आज रविवार रोजी सकाळी 11 वाजेला हस्तीं बँक ते कृपल शॉपी पर्यत तसेच सेवा टाईल्स ते डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्या पर्यत तसेच डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्या पासून ते दुर्गा टी डेपो पर्यत चा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रसंगी प्रभागातील महाराणा प्रताप मित्र मंडळाचे, न्यू प्लॉट परिसरातील जेष्ठ श्रेष्ठ सदस्य, मान्यवरांचा उपस्थितीत भूमिपूजन कारण्यात आले. भूमिपूजन प्रसंगी पंकज चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना मा. आमदार श्री चौधरी यांचे आभार मानत शहरातील सर्वात जास्त कर देणारा परिसर तसेच व्यापारी प्रतिष्ठान असलेला आमचा प्रभाग आहे. तरी येणाऱ्या काळात देखील जास्तीत जास्त निधी आम्हास मिळण्याची विनंती केली व आभार मानले प्रभाग 09 चा नगरसेविका सौ. कल्पना पंडीत चौधरी व पंकज पंडीत चौधरी यांचा विशेष पाठपुराव्याने सदर रस्त्याची काम केली जात असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले येणाऱ्या काळात देखील मोठी विकास कामे शहरा सह मतदार संघात करणार असल्याचा मानस आमदार चौधरी यांनी व्यक्त केला. त्याच प्रमाणे ऍड. विवेक लाठी यांनी देखील मनोगत व्यक्त करत येणाऱ्या काळात देखील आम्ही आपल्या पाठीशी असेच उभे राहू हा विश्वास व्यक्त करत आभार मानले. प्रसंगी जेष्ठ सदस्य भोजूशेठ माहेश्वरी, मोहनकाका जैन, विजयजी पारख, रायसोनी सर, प्रसाद शर्मा, प्रीतपाल सिंग बग्गा, दोढीवाल परिवार, अजीज भाई बोहरी, पंकजभाऊ मराठे, दिनेश शेठ अग्रवाल, जितुभाऊ पारख, योगेश दादा मुंदडे, प्रदीप भाऊ अग्रवाल,नीरजभाऊ अग्रवाल,पंडीतनाना चौधरी, विजयभाऊ कटारिया,सुभाष साखला,अर्बन बँक संचालक सौ. मनीषा लाठी,बॉबी सोनार, पिंकूभाई पटेल,अनिलभाऊ रायसोनी, अक्षयभाऊ अग्रवाल, गटनेते बबलीभाऊ पाठक,सुरेश सोनवणे, बाळासाहेब संदानशिव, मनोहर महाजन सर, धनंजय महाजन, नगरसेवक भाऊसाहेब महाजन, अबू महाजन, श्रीराम आबा चौधरी, बापू चौधरी,सुनीलभाऊ भामरे,मनोजभाऊ शिंगाने यांसह व्यापारी बांधव तसेच आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.