• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन

Feb 25, 2024

Loading

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे ग. स. सोसायटीचे उपाध्यक्ष तथा मराठी वांग्मय मंडळाचे उपाध्यक्ष शामकांत भदाने अध्यक्षीय भाषणातून बोलत होते…
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज दिनांक 24-02-2024 रोजी स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रमाचे उद्घाटक श्री समाधान पारधी लोकनियुक्त सरपंच मंगरुळ ,प्रमुख पाहुणे भाऊसाहेब देशमुख (निवृत्त प्रशासनाधिकारी नगरपालिका अमळनेर ) व कार्यक्रमचे अध्यक्ष श्यामकांत भदाणे (माजी व्हाईस चेअरमन ग. स. सोसायटी जिल्हा जळगाव) , संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर,संस्थेचे कार्यकारी संचालक अँड. भैय्यासाहेब मगर सर, तसेच संस्थेचे सर्व संचालक यांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची. सुरवात मेरे भारत का या गाण्यांपासून करण्यात आली, राधे राधे, छोटा बच्चा, गोविंदा, मेरा वाला डान्स, राधा तेरी चुनरी, असे विविध प्रकारच्या गाण्यावर सर्व विद्यार्थ्यांनी डान्स केला तसेच मोबाईल या संकल्पनेवर नाटक केले ITI चे विद्यार्थ्यांनी अहीराणी गाण्यांवर डान्स सादर करुन सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मन जिंकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रज्ञा पाटील मॅडम यांनी केले तसेच पर्ल इंटरनॅशनल स्कूल विषयी मार्गदर्शन चेअरमन भदाणे सर यांनी केले , तर आभार प्रदर्शन जयश्री पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खाटीक सर ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, सचिन माळी सर, सुनिल मगरे सर, विजय चौधरी सर, सखाराम पावरा, उमेश पाटील, राजु पाटील यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *