

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
पीबीए इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते. इयत्ता १ली ते ४थी पर्यंतचा पहिला गट व इयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चा दुसरा गट अशा दोन विभागात उपरोक्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी अंमळनेर नगरीमधील विज्ञान शाखेसाठी अतुलनीय कार्य केलेले असे मान्यवर अध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद हे परीक्षक मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. यामध्ये प्रा. एम.एस. बडगुजर पी.आर. भावसार विनोद कदम व भटू पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी जेव्हा आपले परीक्षण कार्य आरंभ केले तेव्हा ते प्रलगभ बुद्धिमत्ता च्याद्वारे तयार केलेले नाना विविध प्रकारचे प्रयोग अविष्कार पाहिले ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या अचाट प्रतिभा बघून थक्क झाले. त्यांनी आपल्या मनोगत स्वरूपात भावना व्यक्त करताना म्हणाले की भारताचे भावी भविष्य खरच सुवर्णमय भारताला महासत्ता बनवणारे असेल अशा प्रकारचे शुभेच्छा समस्त सहभागी स्पर्धकांना विद्यार्थ्यांना दिल्या. सदर प्रयोग अविष्कार पाहण्यासाठी अनेक पालक व समस्त शाळेमधील विद्यार्थी या प्रदर्शन कार्यशाळेला भेट देऊन ते सदर केलेल्या प्रयोगाची मीमांसा व कार्यप्रणाली समजावून घेतली. एवढ्या कमी वयाची मुले इतकी अभिनव व मानव जातीला उपयुक्त ठरेल अशा प्रकारची अनुसंधान प्रयोग स्वरूपात त्यांनी मांडली व प्रस्तुत केली होती. मा. मुख्याध्यापक यांनी मनोगतातून अभिव्यक्ती भावना व्यक्त करताना म्हणाले की भारत हा येणाऱ्या काळातील प्रयोग व अनुसंधानाची जननी मांडली जाईल व एक प्रभाव महासत्ता बनेल.
सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन मा. डॉ. संदेश गुजराथी मुख्याध्यापक जे.एस. देवरे पर्यवेक्षिका एम.एस. बारी खुशी बग्गा व्ही.पी. बडवे महेश माळी व्हीजी बोरोले व्ही.एस. अमृतकर स्वाती माळी सुवर्णा भावसार डिंपल देसाई प्रीती बडगुजर प्रशांत वंजारी राजश्री दाभाडे व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे लाभले.
धन्यवाद.