• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे उत्साहात साजरा

Feb 29, 2024

Loading

दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे उत्साहात साजरा

दोंडाईचा ( प्रतिनिधी) दोंडाईचा श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी ९ वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर एका टेलर बांधवांस श्री तुकाराम जगताप यांना कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री तुकाराम जगताप व प्रमुख अतिथी श्री. रतिलाल रामदास शिंपी रा. परिवर्धे ता. शहादा जि. नंदुरबार यांच्या शुभहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची प्रतिमेचे व शिलाई मशिन ची पुजा करण्यात आली.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या दोंडाईचा शहर अध्यक्ष पांडुरंग शिंपी यांच्या शुभहस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सर्व टेलर बांधवांना कल्याण येथील दानशुर बांधव आर एस पी अधिकारी युनिट कमांन्डर डॉ. मनिलालभाऊ शिंपी यांच्या मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,जागतिक टेलर दिनानिमित मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, जागतिक टेलर दिनानिमित मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समासेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक रोटरीचे सचिव, मोटीव्हेशनल स्पीकर डॉ.किशोर अढळकर,लेडीज एक्स्प्रेस ग्रुपचा मधूबेन ठक्कर, यांचा सहकार्याने, नंदूरबार जिल्ह्यातील परीवर्धे येथील ज्येष्ठ टेलर श्री.रतिलाल शिंपी यांचा वयाचा(७५ वर्ष) अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने सर्व टेलर बांधवांना कपडे कटींग करत असतांना लागणारी कात्री सप्रेम भेट म्हणुन देण्यात आली तसेच शिवणकाम करून संसारात मदत करणारे महिला भगिनींनी यांच्या सुद्धा यावेळी कात्री देऊन सत्कांर करण्यात आला कार्यक्रमांसाठी दोंडाईचा कर समाज बांधवाचे ही तेवढीच मदत मिळाली.तसेच यावेळी मंध्यवंर्ती संस्थेचे संचालक प्रा.प्रकाश भांडारकर धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बागुल अध्यक्ष पांडुरंग शिंपी यांनी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले व जागतिक टेलर दिवसानिमित्ताने आज होत असलेल्या सत्कांरामुळे शिवणकाम करणारे टेलर बांधव माजी अध्यक्ष श्री हरीदास जगताप आपले मनोगत व्यक्त केले तसेच दोंडाईचा समाज मंगल कार्यालय बांधकामांस ज्या समाज बांधवानी यावेळी देणगी दिली त्या देणगीदारांच्या सत्कांर करण्यात आला यावेळी जमलेले सर्व शिवणकर्मी बांधवांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोंडाईचा अध्यक्ष पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष शरद पवार, सचिव चंद्रकांत कापुरे, सल्लागार प्रा. प्रकाश भांडारकर, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बागुल, सल्लागार हरिदास जगताप, राजेंद्र गवळे, मधुकर जाधव, मा. उपाध्यक्ष मनोज मेटकर, नरेन्द्र चित्ते, ज्ञानेश्वर सोनवणे, धुळे जिल्हा युवाध्यक्ष विशाल कापडे, मा. युवाध्यक्ष सतीष जाधव, दोंडाईचा युवाध्यक्ष सागर पवार, युवा उपाध्यक्ष योगेश बोरसे, दिपक पवार,महेंद्र जगताप, सुनिल जगताप, सचिन जगताप व धुळे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखा जाधव माजी महिला उपाध्यक्षा सौ. जयश्री पवार सौ.आशाताई जगताप यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास सर्व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन उपाध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेचसचिव चंद्रकांत कापुरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व समाज बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *