• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पारोळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

Mar 1, 2024

Loading

पारोळा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्याकडुन ५८ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यासह खाऊ वाटप ।
दि २९ , विचखेडे ता पारोळा
आज पारोळा केंद्राची शिक्षण परिषद उच्च प्राथ शाळा विचखेडे ता पारोळा या ठिकाणी उत्साह व गुणवत्तापुर्ण वातावरणात संपन्न झाली . या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख प्रदिप राजपुत उपस्थित होते . या परिषदेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनी सहभागी झाले होते .
अगोदर शाळेच्या इ १ ली ते इ ८ वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान , सुंदर गुणवत्तेचे व संस्कृतीचे प्रदर्शन करणारे उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली .
यात सहभागी ५८ गुणवंत विदयार्थ्यांना शाळा क्र ३ पारोळाचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी शालेय उपयोग वस्तु भेट व खाऊ म्हणुन कॅटबरी व राजगिरा लाडु वाटप केले . विद्यार्थ्यांना खुप आनंद झाला . शाळा क्र २ पारोळा कडुन २०१ रु , शेवगे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी १०१ रु , बोदर्डे मुख्याध्यापिका सुषमा पाटील १०१ रु , रत्ना राजपूत शेवगे १०१ रु रोख पारितोषिक दिले .
पदविधर शिक्षक चतुर पवार यांनी परिषदेचे उद्दिष्ट व प्रास्ताविक सादर केले . मुस्तुफा अरब यांनी सुंदर व विविध माहिती देत सुत्रसंचलन केले . सी डब्लु एस एन बाबत शितल पाटील यांनी माहिती दिली . आय सी टी वापर सायबर सुरक्षा बाबत शुभांगी लोहार यांनी मार्गदर्शन केले . केंद्रप्रमुख प्रदिप राजपुत यांनी प्रशासकीय आढावा घेत प्रत्येक शाळेने बालरक्षक नेमुन एका तरी शिक्षकाने याची काळजीपूर्वक जबाबदारी पार पाडावी . दाखलपात्र विद्यार्थी शोधुन त्यांना शाळेत दाखल करण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले . शेवटी सुनिल बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *