

प्रताप महाविद्यालयातील गणित विभागातर्फे जागतिक विज्ञान दिवस साजरा
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली.
नोबेल पुरस्कार (१९३०) विजेते सर सी व्ही रमण यांच्या नावाने भारत सरकार तर्फे सन १९८७ पासून सदर विज्ञान दिन साजरा केला जातो.
वैज्ञानिक रांगोळी ही स्पर्धा विद्यार्थ्यानंमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी आयोजीत करण्यात आली.
या स्पर्धेत जवळपास ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. अभ्यासातील विज्ञानाच्या प्रात्यक्षिक स्वरूपातील विज्ञान विद्यार्थिनींनी रांगोळी मार्फत अनुभव घेतला. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, प्रा. वृषाली वाकडे आणि प्रा. पुष्पा पाटील यांनी काम केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना गणित विभागाचे प्रा. रोहन गायकवाड यांनी विज्ञाना विषयी मार्गदर्शन केले. प्रसंगी “आपण विज्ञानाची सृष्टी पाहिलीच आहे त्यासोबत आपली दृष्टी ही वाढवावी”. असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन तसेच आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्क्षस्थानी गणित विभाग प्रमुख प्रा. नलिनी पाटील यांनी भूषविले. मंचावर प्रा. वंदना भामरे, कामिनी बोरसे.प्रियंका पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुचिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश माळी विद्यार्थ्याने केले.