• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन

Mar 2, 2024

Loading

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असल्याने त्यासाठी जळगांव जिल्ह्याचे नियोजनासदर्भात दि.४ मार्च रोजी मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेस चे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही १० व ११ मार्च रोजी नवापुरमार्गे महाराष्ट्रात येणार असून त्यानिमित्त होणाऱ्या सभेसदर्भात जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहभागासंदर्भात दि.४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सिव्हिल सोसायटी पदाधिकारी,निर्भय बनो आंदोलनाचे पदाधिकारी,पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटना चे संयुक्त बैठक उत्तर महाराष्ट्र काँग्रेस समनव्य व जेष्ठ नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.या बैठकीला माजी मंत्री आमदार के सी पाडवी, आमदार कुणाल बाबा पाटील धुळे,आमदार शिरीष चौधरी रावेर,धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्याम सनेर, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष योगेंद्र पाटील,प्रदेश सचिव विनोद कोळपकर,उत्तमराव देसले साक्री,मदन जाधव,खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.सदर बैठकीला जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा किसान काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *