- सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिले महिला अधिवेशन
- चला सावित्रीमाईच्या लेकींनो चला माहेरी नायगावला – ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षिदार होऊया !
- सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका ज्ञानदेवी सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकदिवशीय पहिले महिला अधिवेशन सावित्रीमाई फुले यांच्या माहेरी नायगाव ( तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ) येथे रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी आयोजित केले आहे.कार्यक्रमाचे स्थळ ज्ञानदेवी सावित्रीमाई फुले सभा मंडप,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर नायगाव येथे आहे.स्वागताध्यक्षपदी शुभांगीताई नेवसे ( माजी सभापती पं.स.खडाळा )आहेत.संमेलनाच्या उद्घाटिका रुपालीताई चाकणकर (अध्यक्षा,म.रा.महिला आयोग ) उद्घाटन सकाळी नऊ वाजता सत्यशोधक समाजाच्या झेंडा वंदनाने करतील.१ ले सत्र उद्घाटन सत्र ९ .१५ वाजता प्रारंभ होईल.प्रमुख पाहुणे वैशालीताई पतंगे ( अति.आयुक्त,वस्तु व सेवा कर,पुणे ),स्वाती कोरी ( नगराध्यक्षा,नगर परिषद,गडहिंग्लज ),मंजिरी धाडगे ( प्रदेशाध्यक्ष,महिला आघाडी,अ.भा.म.फुले समता परिषद ),कॉ.आनंदी अवघडे ( सामाजिक कार्यकर्त्या,सातारा ),डॉ.कुंदा धुळे ( भुलतज्ञ,छत्रपती संभाजीनगर ), मिनाक्षी राजेंद्र कुंभार ( सामाजिक कार्यकर्त्या,जयसिंगपूर ),जयश्री लोंढे (राज्य कार्यकारणी सदस्य, ईब्टा शिक्षक संघटना,श्रीगोंदा ) उपस्थित राहतील.प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे (अ.भा.महिला फेडरेशन महाराष्ट्र राज्य ),सुजाता गुरव (अध्यक्षा,सत्यशोधक ओबीसी परिषद – महिला ), झेबुन्निसा शेख ( प्रणेत्या,जबरन ज्योत शेतकरी संघटना,नागपूर ),दर्शना पवार (लेखिकाअमळनेर ),ॲड.वासंती नलावडे ( जिजाऊ सन्मान समिती,पुणे ) आहेत.उद्घाटन सत्राच्या अध्यक्षा वंदनाताई वनकर (संयोजिका,सत्यशोधक समाज महिला संघ,महाराष्ट्र राज्य )आहेत.स्वागत समिती अध्यक्ष साधना नेवसे (सरपंच,नायगाव ), कार्याध्यक्षा रूपाली इंगोले ( उद्योजिका, पुणे ),संयोजिका शिवमती उज्वला तांबे आहेत. प्रास्ताविक अर्चना तांबे,सूत्रसंचालन माधुरी खैरनार,आभार प्रदर्शन अनुरिता झगडे करतील.
- गट चर्चासत्र सकाळी ११.३० ते दुपारी१.३० कालावधीत ‘ प्राचीन भारताची क्रांतीकारी महिला कालांतराने गुलाम का झाली ? ‘ या विषयावर होईल.अध्यक्षस्थानीॲड.वैशालीताई डोळस ( सामाजिक कार्यकर्त्या,सुप्रसिद्ध वक्त्या ,छत्रपती संभाजीनगर ) असून विशेष निमंत्रीत निताताई नेवसे ( माजी नगराध्यक्ष,फलटण ),सविता फाळके ( माजी सभापती, न.प. सातारा ), सुनंदा जाधव (अध्यक्षा,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समिती,आदर्की,फलटण ), संगिता सुर्यवंशी (आगार प्रमुख रा.प.छत्रपती संभाजी नगर ),गायत्री इरले ( जिल्हाध्यक्षा,अ. भा.माळी महासंघ,गोंदिया ),लता खाडे (अध्यक्षा,सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठ ),सुनिता माळी ( संचालिका,राष्ट्रीय श्रमिक सहकारी संघ मर्यादित दिल्ली,धुळे ),वैष्णवी राऊत (श्री. संत शिरोमणी सावता माळी समाज मंडळ,महाड ), संगीता वसमाने (अध्यक्ष,मातंग समाज, शिरोळ ) मान्यवर आहेत. चर्चासत्राचे प्रास्ताविक रिंपल जाधव,सूत्रसंचालन प्रतिभा महाजन आणि आभार कु.श्वेता शिंदे करतील.गटचर्चा सत्रानंतर भोजन अवकाश राहिल.
- संमेलनपूर्व शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी विराज लॉन्स, खंडाळा येथे सायंकाळी सात वाजता ” मी सावित्री बोलतेय… ” हा एकपात्री प्रयोग अमरावती येथील वैशाली घाकुलकर सादर करतील.रात्री ८ .१५ वाजता ‘ सावित्रीबाई फुले महिलांसाठी दीपस्तंभ ‘ या विषयावर व्याख्यान होईल. रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता शिरूरचे कीर्तनकार ह.भ.प.विजय महाराज भोईर यांचे ज्ञानदेवी सावित्रीमाई फुले सभा मंडपात सत्यशोधकीय कीर्तन होईल.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समितीच्या प्रमुख लता नरुटे ( सभापती पं.स. खंडाळा ),सभापती गीतांजली क्षीरसागर (खंडाळा ),नंदा गायकवाड (नगराध्यक्षा, खंडाळा ) यांच्या मार्गदर्शनात ६३ कार्यकर्त्या,कार्यनिष्पादन समितीत ३६ कार्यकर्त्या,संयोजन समितीत ३९ कार्यकर्त्या तसेच मुख्य समन्वयक समितीत ५२ कार्यकर्ते आणि प्रसिद्धी समितीत खान्देशचे पत्रकार प्रमोद पाटील ( धरणगाव ) व मुक्त पत्रकार विजय लुल्हे (जळगाव ) यांसह सुनिल रासकर ( खेड बु.), पत्रकार राम ( नागपुर ), मुराद पटेल ( शिरवळ ) कार्यकर्ते अखंड परिश्रम घेत आहेत.दिनांक ९ मार्च रोजी मुक्काम व भोजनाची व्यवस्था विराज लॉन्स,खंडाळा येथे करण्यात आलेली आहे.
- सन्माननीय विशेष सल्लागार :- संमेलनाच्या ऐतिहासिक अधिवेशनास माननीय डॉ.आ.ह.साळुंखे, सरोजमाई ( एन.डी.पाटील ),वसंतराव फाळके,उत्तमराव पाटील,शंकरराव गाढवे,बकाजीराव पाटील,माननीय जी.ए.उगले,दिलावर खान,एस.वाय.पवार सर,चंद्रकांत ढमाळ,डॉ.दत्ताजीराव जाधव,मा.राजेंद्रभाऊ नेवसे,सिदूनाना नेवसे,महामित्र दशरथ फुले, रत्नकांत भोसले,सुभाष सावंत सर,डॉ.बी.के.यादव,डॉ.ज्ञानेश्वर गोरे,डॉ.छाया पोवार
- अधिवेशन ऐतिहासिक व्हावे यासाठी अविश्रांत विशेष सहकार्य करणाऱ्या संस्था व संघटना :- नायगाव समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत आणि भैरवनाथ शिक्षण संस्था,सत्यशोधक समाज संघ सत्यशोधक व महिला महासंघ महाराष्ट्र प्रदेश,समाजक्रांती, विदर्भ,अ.भा.महात्मा फुले समता परिषद (सातारा ),विदर्भ तेली समाज आणि विदर्भ संघर्ष वाहिनी,सत्यशोधक ओबीसी परिषद,आम्ही सावित्रीच्या लेकी ( पुणे ), श्री संत शिरोमणी सावता माळी समाज मंडळ ( महाड ), गुरुदेव सेवाश्रम मंडळ ( अमरावती ),माळी समाज सेवा संस्था ( अंबरनाथ ),जीवन संपदा ज्येष्ठ महिला मंडळ ( नागपूर ),माळी सेवा संघ ( खंडाळा ), क्रांतीज्योती महिलाघटना ( भंडारा ),भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र राज्य,भारतीय बौद्ध महासभा ( भोर , पुणे ),जिजाऊ ब्रिगेड (शिरवळ ), सावित्रीबाई फुले महिला मंडळ ( यवतमाळ ), युवाशक्ती मंच ( सौंदड – गोंदिया )
- सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व पहिल्या महिला अधिवेशनास व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या माहेरी पवित्र मायभूमीला वंदन करण्यासाठी सावित्रीमाईच्या सुजाण लेकींनी आवर्जून बहुसंख्येने उपास्थिती देऊन एक उच्चांक घडवावा असे कळकळीचे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार व संस्थापक सचिव डॉ.सुरेश झाल्टे तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रमोद पाटील व विजय लुल्हे यांनी केले आले आहे.
