• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल,संघटन नागपूरचे चा अंतर्गत धुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथकाची स्थापना

Mar 2, 2024

Loading

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल,संघटन नागपूरचे चा अंतर्गत धुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथकाची स्थापना

आमचे जीवन सेवेसाठी. धुळे( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे,पालघर,नाशिक विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी, व ठाणे नवी मुंबई नाशिक विभागीय समादेशक श्री. दिलीप स्वामी सर यांचा मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2 मार्च 2024 शनिवार रोजी धुळे येथे ,बाफना हायस्कूल अँड ज्यू.कॉलेज मध्ये ,महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा आर एस पी समादेशक गणेश सोनवणे,श्री. नितिन कापडीस यांनी नियोजन केले होते. यावेळी दिलीप स्वामी यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे महत्व, जबाबदारी,आणि पथक नोंदणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती दिली. आर एस पी विभागीय अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची वाटचाल, आर एस पी विषयाची व्याप्ती आणि गरज तसेच आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की समाजातील प्रत्येक घटकापर्यंत वाहतुकीचे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे, वाहतुकीचे नियम विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करणे आवश्यक आहे,म्हणून शासनाने आपल्या शिक्षक बांधावांवर हा विश्वास दाखवून पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांचा संयुक्त विद्यमाने आर एस पी हा विषय राबविण्यात येत आहे.तरी यापुढे आपण सर्वांनी आपले शहर अपघात मुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम ,स्पर्धा, आयोजित करून वाहतुकीचे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत मोहीम यशस्वी करायची आहे.असे सांगितले, यावेळी परिवर्तन शिक्षण संशचे नितिन कापडीस, एकविरा देवी माध्यमिक शाळेचे गणेश फुलपगारे, संजयकुमार वाघ,अग्रसेन विद्यालयाचे,गणेश सोनवणे,विजय अग्रवाल,प्रणव कोठवाल,श्रीमती बाफना प्रा.विद्यालयाचे संजय ठाकूर, व प्रविण वाघ,मंडलिक विद्यालाचे ललित वाघ,सी. एस बाफना विद्यालय फागने येथील, श्री.संजय कापुरे,विद्या विकास शाळेचे कैलास बागुल,कमलाबाई कन्या विद्यालयाचे केदार नाईक,यांच्यासह संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.विषयाचे प्रस्ताविक गणेश सोनवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *