1 min read

समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत मतदान जनजागृती मोहीम राबविणार-अनिकेत पाटील जिल्हा स्वीप नोडल अधिकारी

Loading

समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत मतदान जनजागृती मोहीम राबविणार. श्री.अनिकेत पाटील जिल्हा स्वीप नोडल अधिकारी.

जळगाव: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान जनजागृती संदर्भात प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन श्री.अनिकेत पाटील डेप्युटी सी.ई.ओ.तथा जिल्हा नोडल अधिकारी यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अरविंद अंतुर्लीकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने येथील अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी सहविचार सभेत ते बोलत होते. समाजातील सर्वच घटकांना मतदान प्रक्रियेत सामील करून घेऊन नव मतदार तसेच महिला मतदार, दिव्यांग मतदार, पारलिंगी मतदार, संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम राबवून त्यांना मतदान करण्यास उद्युक्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यात कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यावर अधिक भर द्यावा असे आवाहन दुसरे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा असिस्टंट कमिश्नर समाज कल्याण विभाग श्री.योगेश पाटील यांनी केले. सदर मोहिमेत सर्वच समाज घटकांचा विविध प्रसिद्धी माध्यमांचा प्रभावी वापर तसेच विद्यापीठाद्वारे नियुक्त करण्यात आलेले कॅम्पस अँबेसॅडर यांच्या सहकार्याने अधिकाधिक समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले. सदर बैठकीला सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी डॉ.अतुल इंगळे,प्रा.राहुल वराडे, डॉ. जयंत लेकरूवाळे (संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ कबचौउमवि जळगाव), डॉ.उमेश गोगाडिया (राज्यशास्त्र विभाग प्रमुख कबचौउमवि जळगाव), डॉ.मिलिंद बागुल (मुख्याध्यापक असोदा हायस्कूल), श्री.मुकुंद गोसावी (दिव्यांग आयकॉन), आरजे शिवानी श्री.गिरीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *