बाम्हणे गावात नेहरू युवा केंद्र तर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
बाम्हणे गावात नेहरू युवा केंद्र तर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
शिंदखेडा -तालुक्यातील बाम्हणे गावात माध्यमिक हायस्कूल प्रांगणात क्रीडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे व संकल्प सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने शिंदखेडा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाम्हणे येथील माध्यमिक हायस्कूल येथे करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, रस्सीखेच इ. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा तालुक्यातील विविध गावातील क्रीडा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्र चे जिल्हा युवा अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शन तून घेण्यात आली. तसेच.क्रीडा स्पर्धेचे उदघाटन मुख्याध्यापक बी. एस.निकम व राहुल माळी यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक समाधान ठाकरे,गोपाल भोई, अभिलेख पाटील होते तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम समाधान ठाकरे,गोपाल भोई,चेतन चौधरी, हर्षल सैनंदाने,अजय वाघ,समाधान ठाकरे यांनी केले.

