• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्न

Mar 24, 2024

Loading

जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्न
मा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात केआरसी म्हणून जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधुन जलसुरक्षक व महसूल गावातील प्रत्येकी एक FTK तंज्ञ महिला असे एकुण दोन व्यक्ती यांना सदर प्रशिक्षण देण्यात आले तसेच जळगाव जिल्हात सर्व ग्रामपंचायत यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रसंगी कार्यक्रम साठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री भरत कोसोदे , मा.श्री. दीपक राजपूत जिल्हा पाणी गुणवत्ता अधिकारी जिल्हा परिषद जळगाव , महेश सोनवणे समन्वयक अमलबजावणी सहाय्यक यंत्रणा जिल्हा परिषद जळगाव , राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण घेण्यात आले
मा. श्री.भरत कोसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांनी मार्गदर्शनपर सर्व ग्रामपंचायत मधुन एक जलसुरक्षक व महीला प्रतिनिधी यांना हे प्रशिक्षण आपल्याला पुढील काळासाठी पाणी नमुने चेक करण्यासाठी खुप आवश्यक आहे कारण प्रत्येक गावात पाणी तपासणी किट देण्यात येणार आहे व त्या किट द्वारे सदर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती गावातच पाणी तपासणी करण्यात येईल त्यामुळे हे प्रशिक्षण खुप महत्वाचे आहे असे देखील त्यांनी सांगितले आपल्या प्रत्येक गावात आपण प्रशिक्षण घेऊन आपल्याला गावात उर्वरित चार महिलांना देखील आपल्या मार्फत टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात यावं कारण प्रत्येक गावातून पाच महिलांची निवड करण्यात आली आहे त्या पैकी एका महिलेला व एक जलसुरक्षक यांना सदर प्रशिक्षण देण्यात आले जल जीवन मिशन कार्यक्रमांमध्ये या प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री भरत कोसोदे यांनी सांगितले त्यामुळे प्रशिक्षणाची खुप गरज आहे असे देखील सांगितले सदर प्रशिक्षणात जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक व एक FTK तंज्ञ महीला यांना प्रशिक्षण देण्यात सर्व प्रशिक्षणार्थी यांना बॅग , वाचन पुस्तक , नोट पॅड , पेन, प्रमाणपत्र सर्व प्रशिक्षण संपल्यावर प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आले.
सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव अंकित साहेब, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जळगाव मा.भरत कोसोदे मार्गदर्शनाने तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भूपेंद्र महाले यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास संस्थे मार्फत सदर प्रशिक्षण घेण्यात आले या प्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी तंज्ञ प्रशिक्षक व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांचे सहकार्य घेण्यात आले, राष्ट्रविकास संस्थेचे सचिव श्री. तुषार पाटील या दरम्यान प्रशिक्षण नियोजन तसेच संस्थेचे संचालक रागिणी महाले यांच्यासह संस्थेचे प्रतिनिधी नयना चौधरी,महेश माकडे, सुशिल केदारे , नवल पाटील, प्रमोद पाटील, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, सीमा महाजन, अमोल सुर्यवंशी,निलेश पाटील,गणेश राजपूत , राजेश्वर पाटील, गणेश पाटील,पवण सनसे, कौशल पवार, सुमेध खरे, नितेश चव्हाण,नजीम पठाण, राहुल सूर्यवंशी, रोहन पाटील, कुणाल पाटील, भाग्यश्री गोसावी, हिलाल पाटील हे सदर प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वीरित्या केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *