• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

दया, करुणा, प्रेम हृदयातून करणारा मसीहा येशू!!!

Mar 29, 2024

Loading

दया, करुणा, प्रेम हृदयातून करणारा मसीहा येशू!!!

जगात अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माची वेगळी खासियत आहे. जगाला प्रेम, करुणा, दया ची शिकवण देणारा एक धर्म आहे तो म्हणजे ईसाई धर्म होय. तोच ख्रिश्चन धर्म होय.एकेश्वरवादाचा पुरस्कर्ता करणारा धर्म आहे. ह्या धर्माचा संस्थापक करुणेचा सागर येशू होय. ह्या येशूचा जन्म एका गोठयात झाला. त्याचे वडील सुतार होते. बेथेलहेम नावाच्या गावात झाला. त्याच्या आईचे नाव मेरी होते. त्याच्या वडिलांचे नाव योसेफ होते. येशू, यीशू, येशूआ हे त्यांचीच नावे आहेत. इंग्रजी उच्चारण येशूआ शब्दाचे जेशूआ झाले. त्याचे अपभ्रंश होऊन पुढे जीजस झाले. येशूचे मूळगाव नाजरथ होते.कामानिमित्त त्याचे वडिल बेथलेहम ला आले. मेरी कुवारी असतानांच येशूचा जन्म झाला. येशू हा यहूदी होता. त्याकाळात प्रत्येक देशांप्रमाणे धर्मगुरु यांची सत्ता राजसत्तेवर चालत असे. धर्मांध धर्मगुरू मनमानी करित. स्वतःच्या फायदयाचे नियम बनवून लोकांना छळत असत. त्यांनी लिहलेल्या ग्रंथाला देवाची वाणी सांगून नीतीमूल्याची हानी करित असत. त्यामुळे राजे सत्ताधिश त्यांच्या नियमांना उपासकांवर लादत असत. त्यामुळे किती ही शुध्द धर्म हा मानवतेवर कलंक ठरत होता. ह्या काळात ही ग्रंथ प्रामाण्य मानले पाहिजे हा पोप, धर्मगुरू, पादरी यांचा आदेश होता. जनता ह्या लादलेल्या नियमांना कंटाळली होती. अशा काळात प्रेमाची भाषा सांगणारा येशू चा जन्म होऊन मानवतेची बीजे रोवली गेली. जवळपास 2 हजार वर्षा पुर्वी येशूचा जन्म झाल्याचे मानले जाते. येशू ख्रिस्ताने लोकांची दुःख समजून घेऊन त्यांना प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला. प्रत्येक धर्माचा पाया हा करुणेवर ऊभा असतो. जो धर्म करुणा बाणत नाही तो रसातळाला जातो. हिंसेने परिवर्तन होत नाही. येशू चे मानवतावादी विचार धर्मसंस्थेचे वर्चस्व नष्ट करणारे होते. येशू ने जगाला अहिंसा दिली. प्रेम हे ईश्वर प्राप्ती चे साधन आहे. जेव्हा आपण दुसऱ्याची काळजी घेतो तेव्हा येशू आपल्यात असतो. स्वार्थासाठी जगू नका. चोरी करु नका. व्याभिचार टाळा, सर्वांवर प्रेम करा. राग, क्रोध, मत्सर, मोह यावर प्रेमाने, करुणेने विजय मिळवा. येशू गावोगावी सत्य मांडत चालला. त्याने निस्वार्थ कर्म सुरु ठेवले. कर्मठ धर्मगुरु यांनी रोमन राजा तिबेरियस याला येशू धर्मात ढवळाढवळ करित असल्याची तक्रार केली. राजा तिबेरियस याने आपला सरदार पोंटीयस पिलातूस याला येशूवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोंटीयस पिलातूस ने येशू ला कुसावर खिळे ठोकुन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्याकाळी धर्मसत्तेचा राजावर दबदबा होता. येशूने मानवता रुजविली होती. त्याला कुसावर लटकविण्यात आले. सहा तास येशू कुसावर लटकत होता. जनता आक्रोश करित होती. शेवटी छातीत भाला खुपसून येशूला मारण्यात आले. येशूने मारणाऱ्या लोकांबद्दल काहीही प्रतिकार केला नाही. देवाला सांगितले देवा यांना माफ कर कारण हे काय करित आहे हे त्यांना समजत नाही. किती उदार, करुणेचा हुंकार येशूने मारणाऱ्या लोकांना क्षमा केली. येशू चे देहावसान झाले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे होय. ह्या दिवशी येशूने आपली जागा देवाजवळ निश्चित केली. अपार करुणेचा उगम त्याच्या कृतीतून झाला. प्रेम करा त्यातून तुम्हाला मानवतेचा सुगंध मिळेल हा संदेश येशू ने जगाला दिला. मारणारा हा अज्ञानी आहे त्याला काहीही समजत नाही. तो स्वतःच्या शरिरावर प्रेम करणारा आहे. त्याला दया हे साधन प्राप्त झालेले नाही. धर्म संस्थेने येशूवर 3 आरोप लावले होते. त्यात येशू स्वतःला देवाचा देवदूत समजतो. ग्रंथ प्रामाण्य मानीत नाही. धर्माच्या आज्ञेशिवाय ज्ञान देतो. चुकिचे ज्ञान पसरवितो. असे आरोप धर्मगुरू यांनी केले. धर्मगुरु च्या दबावापुढे जनता हतबल होती. येशूच्या तार्किक वादाला धर्मगुरु उत्तर देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी येशूला धर्मद्रोही ठरवून शिक्षा दिली. असे प्रकार सर्रास धर्मगुरु, धर्माचे ठेकेदार करित आलेले आहे. सॉक्रेटिस, गॅलिलिओ यांना धर्मगुरुंचा फार त्रास झाला परंतू त्यांनी प्रबोधन करणे सोडले नाही. बलिदान दिले परंतू खोटे अंगिकारले नाही. प्रत्येक धर्म हा परिवर्तन करायला धजत नाही. मानवतावाद तो जपत नाही. विज्ञान स्विकारत नाही. जो तर्क करित त्याला शिक्षा करतो. आजही धर्मसंस्थापक व अनुयायी यांच्या विचारात फारकत दिसते. येशूच्या निर्वाणानंतर 3 दिवसांनी येशू पुनर्जन्म झाल्याची अख्यायिका आहे.त्यानुसार ईस्टर संडेला येशू थडग्यातून बाहेर आला. आपल्या शिष्यांना भेटला असे ग्रंथात लिहले आहे. तो दिवस म्हणजे ईस्टर संडे होय. येशूचा देहांत दिवस हा गुड फ्रायडे म्हणून साजरा करतात. तर 3 दिवसांनी येशू पुन्हा पृथ्वीवर यायचा दिवस म्हणजे ईस्टर संडे होय. येशूचा जन्म दिवस 25 डिसेंबर मानतात. गुड फ्रायडे हा गुड का मानतात तर येशू ने करुणेची अंतिम सीमा पार करुन जगाला प्रेमाचा, करुणेचा, दयेचा संदेश दिला म्हणुन गुड फ्रायडे म्हणतात. धर्मावर पुन्हा पुन्हा अज्ञान, अंधकार, अहंकार, हुकूमशाही, धर्मांधतेची काजळी चढते. सत्य स्विकारण्याची धमक जो धर्म ठेवतो तो प्रकाशमान होतो.

पत्रकार
एस. एच. भवरे
9284695140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *