• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप कॉलेज जवळ नियमित बस थांबवा, विद्यार्थी व पालकांचेआगार व्यवस्थापक अमळनेर, बस डेपो यांना निवेदन

Mar 29, 2024

Loading

प्रताप कॉलेज जवळ नियमित बस थांबणेबाबत विद्यार्थी व पालकांचे
आगार व्यवस्थापक अमळनेर, बस डेपो यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
उपरोक्त विषयान्वये विनंती पूर्वक अर्ज करितो कि, अमळनेर निम रूट च्या
सर्व मुल- मुली दररोज कळमसरे ते अमळनेर Up-Down करतात प्रताप कॉलेज बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही. आणि चालक व वाहक विद्यार्थ्यांना अरेरावीची भाषा करतात.दि.२८/०३/२०२४ रोजी कळमसरे ते अमळनेर बस क्र. MH.14 BT 1874 श्री.एच.एस. सूर्यवंशी सदर वाहकाने प्रताप कॉलेज जवळ दोनदा बेल देवून सुद्धा चालकाने बस थांबवली नाही व बस रेल्वे ब्रीज उतरवून पाण्याच्या टाकीजवळ बस थांबवली व विद्यार्थ्यांना अरेरावी ची भाषा करायला लागला व तुम्ही मुली काय आमच्या उपकारावर शाळेस शिकायला येतात का ? बस वाहकाने चालकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण चालक समजण्याच्या मनस्थित नव्हता ? हि त्यांची वागणूक अशोभनिय आहे तरी सदर बस या पुढे जर प्रताप कॉलेज जवळ थांबवली नाही तर या पुढे बस डेपोत तीव्र आंदोलन करण्यात येईल व सदर चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात यापुढे असे कुठलाही चालक व वाहक वागणार नाही याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन मा.दादासो, अनिल भाईदास पाटीलमंत्री मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापण यांना पण पाठविण्यात आले आहे.
कळमसरे येथील पालक सतीश राजपूत, विद्यार्थी जागृती पाटील, प्रेरणा पाटील, चैताली पाटील, गायत्री पाटील, जानवी महाजन, चेतना चौधरी, मानसी चौधरी, धनश्री बोरसे, उज्वला जगदाळे, गायत्री पाटील, हर्षल गुजर, तेजस कोळी, ऋषिकेश चौधरी, विवेक पाटील यांच्या सह्या निवेदनावर आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *