श्री पेडकाई व सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा निमित्त विशेष पूजा
अमळनेर प्रतिनिधी

येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते .मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले. ही बाब मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना कळाली.श्री पेडकाई माता त्यांची कुलदेवी असल्याने त्यांनी तत्काळ सदर मंदिराचा जीर्णोद्धार केला. ख्यातनाम कलावंत गणेश सपकाळे यांनी मंदिरास रंगरंगोटी केली. मुर्त्यांना सुंदर रंग काम केले. आज रामनवमीनिमित्त डॉ. महाले यांनी ज्यांची कुलदेवता पेडकाई माता आहे अशा आर. के. नगर परिसरातील काही भाविकांना तेथे बोलाविले. सर्वांनी नवमी निमित्त ची विशेष पूजा व आरत्या केल्या. यावेळी उद्योगपती विनोद भैया पाटील, उद्योगपती बिपिन बापू पाटील, लोकमतचे रवींद्र बोरसे,
ऍड .संदीप बोरसे, जान्हवी बोरसे , प्रशांत महाले ,रवींद्र बी बोरसे,अमोल बोरसे ,राजेंद्र महाले ,तेजू बोरसे , कैलास बोरसे
आदी उपस्थित होते यांनी यतीन जोशी यांनी पौराहित्य केले
लवकरच व्यापकतेने होणार कार्यक्रम
आज जमलेला भाविकांनी यापुढे या मंदिराची नित्यसेवा आळीपाळीने आपणच करावी असे ठरविले .तसेच शहरात सर्व संमतीने सर्वांना सोयीस्कर होईल अशा मोकळ्या जागी पेडकाई मातेचे मोठे मंदिर बांधून तेथे कायमस्वरूपी सण ,उत्सव व व्रतवैकल्य करावेत असे ठरले .लवकरच याबाबत बैठक होणार आहे.