• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धुळे रोड अरिहंत मेडिकल जवळ व मंगलमुर्ती चौकात गतिरोधक बसवा

Apr 24, 2024

Loading

धुळे रोड अरिहंत मेडिकल जवळ व मंगलमुर्ती चौकात गतिरोधक बसवा

अमळनेर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे मागणी

अमळनेर प्रतिनिधी
शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात धुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने रस्ता क्रॉसिंग करताना मोटरसायकल व सायकलींचे अपघात होतात. जवळच सानेगुरुजी शाळा आणि सावित्रीबाई कन्या विद्यालय असल्याने शाळा भरणे व सुटण्याच्या वेळी रोज किरकोळ अपघात होतात. मुख्य राज्य मार्गावर गतिरोधक बसवण्याची परवानगी मिळत नसली तर अरिहंत मेडिकल जवळ गतिरोधक बसवल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण होईल आणि किरकोळ अपघात टळतील. तसेच मंगलमूर्ती चौकात देखील नेहमीच वर्दळ असते त्याठिकाणी देखील रस्ता ओलांडताना शाळकरी मुले व महिला , वृध्द यांना खूप त्रास होतो. अनेकदा अपघात होत असतात अनर्थ टाळण्यासाठी मुख्य रस्ते सोडून शहरातील रस्त्यांवर या दोन्ही ठिकाणी गतिरोधक बसवावेत असे अमळनेर युवा मित्र परिवाराचे पदाधिकारी मनोज शिंगाणे , भूषण बडगुजर , राहुल कंजर , अंकीत देशमुख , सचीन परदेशी , राज लाड , चेतन पाटील , सागर विसपुते व योगेंद्र बाविस्कर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *