• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न

Apr 28, 2024

Loading

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रातील शिक्षक बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी कल्याण लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यांच्या समवेत माजी आमदार जगन्नाथआप्पा शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री नाना सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, शहर प्रमुख महेश गायकवाड, नगरसेवक सुनील वायले, चंद्रकांत पवार, विष्णू विशे , गणेश पाटील , प्रशांत भामरे , गोकुळ पाटील , धनाजी दळवी , दिगंबर बेंडाळे , जोहरे , प्रवीण लोंढे सर, अनिल पाटील , विजय पवार , एन एम भामरे , आर डी पाटील , अनिल बोरणारे , मेस्टा कोकण अध्यक्ष गजानन पाटील , मेस्टा ठाणे अध्यक्ष नरेश पवार , नगरसेविका मधुरा काळे, महिला अध्यक्ष नूतन पाटील महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य पदाधिकरी, जिल्हा पदाधीकारी, तालुका पदाधिकारी, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, भाजपा शिक्षक आघाडी, कलाध्यापक संघ, शिक्षक क्रांती, शिक्षक परिषद, कास्टट्रायब संघटना, इत्यादी संघटना व अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षक मेळाव्यात जवळपास 1500 शिक्षक बांधव उपस्थित होते त्यांना *मा. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना 1160 कोटी अनुदान देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर यांनी दिले त्याचा लाभ जवळपास 66 हजार शिक्षक बांधवाना झाला, जुनी पेन्शन योजना लवकर लागू होणार त्याकरिता राज्यातील सरकार सकारत्मक आहे आचारसंहिता संपल्या नंतर 26000 शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, वाढीव टप्पा देण्याकरीता प्रयत्न सुरु असून तो विषय देखील येत्या जून महिन्यात मार्गी लागेल, विनाअनुदानावरून अनुदानावर भरती बंदी उठविण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत, संच मान्यतेतील निकषांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, आज पर्यंत 93 शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या घरातील वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीस मान्यता मिळवून दिल्या आहेत, कनिष्ठ महाविद्यालयातील 512 वाढीव पदास मान्यता मिळवून दिल्या, अनेक शिक्षक व शिक्षेकेतर बांधवांचे शालार्थ मिळवून दिले आहेत, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत, आमदार स्थानिक विकास निधी 2023-24 अंतर्गत कोकण विभागात 1136 शाळांना Digital e-learning equiptment चे वाटप केले*, अश्या अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मार्गदर्शन करून या या निवडणुकीत आपण आपण शिक्षक आहात आपला मोलाचा वाटा निवडणुकीत असतो, आपण समाज घडविण्याचे कार्य करता त्यामुळे आपण लोकांमध्ये जाऊन निवडणुकीची जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढवावा व मला विक्रमी मतांनी निवडून द्यावे अशी भावनिक साद शिक्षकांना घातली.

कोकणविभाग
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत तुकाराम भामरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि शिक्षक बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *