• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धुळ्यातील उघडे परिवारातील भावंडांचे मुंबईत विविध स्पर्धेत अल्पवयातील यश

Apr 30, 2024

Loading

धुळ्यातील उघडे परिवारातील भावंडांचे मुंबईत विविध स्पर्धेत अल्पवयातील यश

धुळे- येथील उघडे व मदने परिवारातील सध्या मुंबईत निवासी असलेले नातवंडं चि. आयुष शरद उघडे या तीन वर्षाच्या बालकाने विझ किड्‌स कॉर्निवल (ऑल इंडिया) तर्फे घेतलेल्या श्लोक स्कॉलर स्पर्धेत तीन ते पाच वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्याने एकश्लोकी रामायण म्हटले होते. तसेच आयुषची मोठी बहिण कु. अवनी शरद उघडे हिने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एका पुस्तकाची लेखक होण्याचा मान मिळविला. तिच्या पुस्तकाचे नांव ‘मिस्ट्रीअस डे’ असे आहे. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश शाळेच्या वतीने ब्रि बुक्स संस्थेमार्फत आयोजित नॅशनल यंग ऑथर्स फेअर पुस्तक लेखन स्पर्धेत तिने आपला सहभाग नोंदविला होता. दिल्ली येथे अवनीच्या पुस्तकास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आयुष व अवनी हे दोन्ही उघडे भावंडं विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यशस्वी वाटचाल करीत आहेत. त्यांना शिक्षकांसोबतच त्यांच्या आई-वडीलांचे विशेष मार्गदर्शन लाभत असते. त्यांचे वडील शरद उघडे हे मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त व माहिती व तंत्रज्ञान चे संचालक आहेत व आई सौ. मयुरी उच्चविद्याविभूषित असून त्यांची पीएच्‌.डी. च्या प्रबंधाची तयारी सुरु आहे. या भावंडांचे आजोबा आजी निवृत्ती नारायण उघडे व सौ. सरस्वती निवृत्ती उघडे हे देखील नातवंडांकडे विशेष लक्ष देत असतात. धुळ्याची न्यू प्रताप मिल व होमगार्ड सेवेत एकेकाळी कार्यरत असलेले निवृत्तीअण्णा उघडे, सुदाम नारायण उघडे, धनगर समाजाचे नेते पंडीत अण्णा मदने, गोविंदराव किसनराव मदने यांचे हे भावंडं नातवंडे असून धुळे पोलीस दलात कार्यरत असलेले रमेश उघडे व सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक रविंद्र उघडे यांचे पुतणे, पुतणी आहेत. धुळे येथील एकेकाळी श्रमिक कष्टकरी कुटुंबातील भावंडं अल्पवयातच मुंबई नगरीत मिळवित असलेल्या यशाबद्दल आयुष व अवनी यांचे कौतुक होत आहे.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *