

एरंडोल येथे बुद्ध जयंती निमित्ताने श्रामनेर शिबिर संपन्न
धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्था तसेच समस्त बौद्ध समाज एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे दिनांक 23 मे रोजी बुद्ध जयंती निमित्ताने धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भरत शिरसाट सर यांच्या संकल्पनेतून एक दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन श्रावस्ती पार्क एरंडोल येथे करण्यात आले होते. सदर शिबिर प्रसंगी 47 उपासकांनी श्रामनेरची दीक्षा घेतली. सर्वप्रथम सकाळी आठ वाजता संपूर्ण एरंडोल मधून बुद्ध जयंती निमित्ताने रॅली काढण्यात आली. ‘आज जगाला युद्ध नको, आज जगाला बुद्ध हवा’ या घोषणेने एरंडोल चे वातावरण बुद्धमय झाले होते. या रॅलीला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सदर प्रसंगी भदंत उपाली व भदंत नागसेन यांची विशेष उपस्थिती होती. भदंत उपाली व नागसेन यांनी उपस्थित श्रामणेरांना चिवर देऊन दीक्षा दिली. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका शहरातून व तालुकाभरातून उपस्थित होते. भदंत उपाली व भदंत नागसेन यांनी उपस्थितांना धम्मदेेना दिली.
सदर शिबिर प्रसंगी भरत शिरसाट सर, डॉक्टर संदीप कोतकर, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, संगीता साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांनी केले. सदर प्रसंगी माजी मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार, भैयासाहेब सोनवणे, प्रवीण केदार, धनराज मोतीराय, चिंतामण जाधव, भगवान ब्रम्हे, सुनील खैरनार, बाबुराव भगत, प्रकाश तामस्वरे, अण्णाभाऊ सोनवणे, सुधाकर मोरे, प्रा उमेश सूर्यवंशी, डाॅ उमेश गवई, प्रा. विजय गाढे यांची विशेष उपस्थिती होती. साळवा, धरणगाव, उत्राण, निपाणे, विखरण व पंचक्रोशीतील अनेक गावांमधून उपासक उपस्थित होते.