
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेची यशाची परंपरा कायम
अमळनेर दि २७ मे
येथील श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेचा एस एस सी चा मार्च २०२३/२४ चा निकाल नुकताच घोषित झाला आहे. एस एस सी परीक्षेत २५५विद्यार्थीनी प्रविष्ठ होत्या. त्यापैकी २५१ विद्यार्थीनी पास झाल्या आहेत. त्यात ९५ टक्केवारी मिळविणाऱ्या पाच विद्यार्थीनी आहेत.९० टक्के मिळविणाऱ्या २० विद्यार्थीनी आहेत. विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या १३२ विद्यार्थिनी,प्रथम श्रेणीत ७२ विद्यार्थीनी द्वितीय श्रेणी प्राप्त करणाऱ्या १८ विद्यार्थीनी आहे तर तृतीय श्रेणीत ५ विद्यार्थीनी आहेत. म्हणजेच शाळेच्या ज्या चार मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत त्यांना ए टी के टी मिळाली आहेत म्हणजेच शाळेचा ९८.४३ टक्के असा निकाल लागला आहे. शाळेच्या या निकालाची अमळनेरात सकारात्मक चर्चा आहे.
शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल, सर्व संचालक मंडळ,शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी,उपमुख्याध्यापक एस बी निकम,पर्यवेक्षिका एस.पी.बाविस्कर,पर्यवेक्षक व्ही.एम.पाटील,शाळेचे जेष्ठ शिक्षक एस.एस.माळी, करुणा शिक्षक डि.एन. पालवे,जे.व्ही.बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी आर. एस.सोनवणे,एस.एस.सी वर्गाच्या वर्ग शिक्षिका बी.एस.पाटील,पी.पी.जोशी,एस.बी.उपासनी,एस.इ.पाटील, व्ही.जे.पाटील,जी.डी.ताठे देशमुख,शिक्षकेतर प्रतिनिधी जे.एस.भालेराव यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेच्या या पाच मुलींनी मिळविले ९५ टक्के गुण
तनुजा संदेश पाटील ९६.४०,
तन्वी योगेश पटेल ९६.२०,
आकांक्षा राजेश पाटील ९५.८०, वैष्णवी राजेंद्र वाणी ९५.४०,तेजल दिपक पाटील ९४.८० टक्के मिळाले आहेत.