पिंप्री -आदर्श माध्यमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी 100 % निकालाची परंपरा कायम..!
यश बोरसे 84.80% गुण मिळवत प्रथम

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – पिंप्री खु येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असुन यश बोरसे 84.80% गुण मिळवत प्रथम, आदित्य बोरसे 84.20 द्वितीय, रोहित पाटिल 83.60 तृतीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांचे कौतुक..!
शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याने व शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवल्याने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर रामजी चौधरी , उपाध्यक्ष श्री प्रमोद चौधरी, सचिव श्री विनोद चौधरी, यांनी विद्यार्थ्यांसह आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे , आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक यांना यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.अंजनी परिसरात सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक होत आहे.