
ओबीसी शिक्षक संघटनेच्या वतीने जगदीश पाटील यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी-
ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित माध्य.विद्यालय पिंपळे या शाळेतील शिक्षक व अमळनेर तालुक्याचे विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जगदीश पाटील सर हे शासनाच्या नियतवयोमनानुसर 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नुकताच ओबीसी शिक्षक संघटनेच्या वतीने
सहपत्निक सत्कार करण्यात आला..
सत्कार प्रसंगी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन व ओबीसी शिक्षक संघटनेचे तालुका सल्लागार तथा सेवानिवृत्त आदर्श क्रिडाशिक्षक आर आर सोनवणे उपस्थित होते..
ते एक विद्यार्थी प्रिय, व उपक्रमशील शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते,विज्ञान शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे ,तसेच स्काऊट गाईड च्या माध्यमातून शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे,तसेच पालकांशी संबंध ,परिचय करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
सत्कार प्रसंगी जगदीश पाटील म्हणाले की ओबीसी संघटनेने माझा सत्कार केला.
नेहमी मी संघटनेच्या ऋणात राहील. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य देईल असे त्यांनी सांगितले..