• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

व्हाईस ऑफ मीडियाच्या सभेत महासचिव दिव्याताई भोसले यांचे मार्गदर्शन

Jun 2, 2024

Loading

व्हाईस ऑफ मीडियाच्या सभेत महासचिव दिव्याताई भोसले यांचे मार्गदर्शन.

अमळनेर प्रतिनिधी

व्हाईस ऑफ मीडिया ही एकमात्र संघटना पत्रकारांच्या समस्येबाबत सरकार दरबारी न्याय मागत असते. आता तर ती भारताची नंबर 1 संघटना म्हणून नावारुपाला आलेली आहे. ह्या संघटनेची अमळनेर शाखेची बैठक शनिवारी दि.1/6/2024 ला
पार पडली. सदर बैठक ही महाराष्ट्रातील व्हाईस ऑफ मीडियाच्या महासचिव तसेच कार्यतत्पर पत्रकार दिव्याताई भोसले यांनी सभा ठिक 7 वाजता संध्याकाळी घेतली. ह्या सभेत अनेक पत्रकार तथा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिव्याताईंनी संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा केली. सदर संघटना ही संघटना निरपेक्षवृत्तीने,रोखठोक, स्पष्ट, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी संघटना आहे. ह्या संघटनेतील पदाधिकारी पैशासाठी कुणापुढे लाचार होणारा नाही. अगदी समाजात त्याची प्रतिमा डागाळलेली नसते. संघटनेत येणारा पदाधिकारी व्यसनापासून अलिप्त असतो. एक लोकशाहीचा कणा असलेला पत्रकार सच्ची पत्रकारिता करतो. निर्भीड लिहतो त्याला कुणाची भीती नसते. दिव्याताईंनी सांगितले की संघटनेत पदाधिकारी निवड होतांना अनेक बाबी पाहिल्या जातात. पत्रकाराचा विमा याबाबत शिबीर घेतले जाते. पत्रकाराच्या मुलाबाळांच्या हितासाठी परिवाराला संरक्षण होइल असा विमा काढला जातो. मुलाबाळांना शिक्षणात सवलत मिळण्यासाठी शासन दरबारी लढा चालू आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. आपल्या तालुक्यात ही याबाबत कार्यक्रम घ्यावा. दर तीन महिन्यांनी विविध कार्यक्रम घेतले गेले पाहिजे. मा. दिव्याताईंनी अमळनेर तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडियाचे काम चांगले आहे. मागे कार्यक्रम घेऊन त्यांनी उत्साह दाखविला आहे. ह्या संघटनेत हा लहान, हा मोठा असा भेद नसतो. समाजाला बोजड होइल असे वर्तन खपवुन घेतले जात नाही.
प्रत्येकाला समान वागणूक मिळते. कामाची पातळी पाहुन पदे दिली जातात. पदाधिकाऱ्यांची पदोन्नती होत असते. कुणी पदाधिकारी नसले तरी त्याला पदानंतर मान असतो. हा परिवार असतो त्यात सर्व समान असतात. या बैठकित काही पत्रकारांनी चर्चात्मक प्रश्न विचारले त्यात रविंद्र मोरे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र व जिल्ह्याच्या बाबत कामगीरी आहे. तालुक्यात कामे झाली पाहिजे. त्यावर उत्तर देतांना त्यांनी तालुक्यातील काम पारदर्शक आहे. कुणालाही विना कारण डावलता येत नाही. बाबुराव ठाकरे ह्यांनी संघटनेच्या इतर कामाची माहिती घेतली. एस. एच. भवरे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या ग्रुप वर अदयावत माहिती देण्याबाबत तसेच विविध प्रकारचे मार्गदर्शन त्यात नविन बातमीचे बदलते स्वरुप यासंदर्भात तज्ञांनी मार्गदर्शन करित रहावे असा सवाल केला. त्यावर त्यांनी संघटनेच्या वेबसाईट वर माहिती घ्यावी तसेच काही अडचण असेल तर जेष्ठांना विचारता येते. या बैठकिला ईश्वर महाजन पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना दिव्याताईंनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सरांनी केले. बैठकीला सर्वांचा परिचय करण्यात आला. बैठकिला अमळनेर तालुकाध्यक्ष अजय भामरे उपाध्यक्ष राहुल बहिरम, कोषाध्यक्ष रविंद्र मोरे, विनोद कदम, ईश्वर महाजन, सोपान भवरे, जयवंतलाल वानखेडे, बापुराव ठाकरे, विशाल मैराळे हे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत शेवटी आभार अजय भामरे यांनी मानले. कार्यक्रमास नविन प्रतिनिधी अॅ ड.गणेश साळुंखे, विजय रायसिंग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *