
सत्यशोधक समाज संघातर्फे गुणवंतांचा भावपूर्ण सत्कार
[ साहित्यिक विजयराव रुम यांनी गुणवंतांना केले सन्मानित ]
यश संतोष सांगोलकर याने रोझलॅन्ड इंग्लिश मेडियम स्कुल मधून दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त करून सन २०२३ / २४ शैक्षणिक वर्षातील बॅचमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.यशला शाल व ग्रंथ देऊन सुप्रसिद्ध साहित्यिक विजयराव रूम (निवृत्त अभियंता,महावितरण ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. क्लॅट कोर्स करून भविष्यात यशला जज्ज बनण्याचे अतूट ध्येय आहे.यशला अवांतर वाचन व धावणे यात रुची आहे.आंतरशालेय स्पर्धेत यशने या स्पर्धांमध्ये बक्षिसेही पटकावली आहेत. यशने आपल्या यशाचे श्रेय मातापिता आणि मुख्याध्यापिका तिवारी मॅडम,वर्गशिक्षिका साधना शर्मा यांना दिले.सत्यशोधक समाज संघातर्फे गौरव भास्कर मिस्तरी याचा सत्कार महेश शिंपी सर ( सेक्रेटरी, जळगाव जे. सी.आय. ) यांच्या हस्ते शाल व ग्रंथ देऊन हृद्य सत्कार दि.३ मे २०२४ रोजी करण्यात आला.गौरव याने ८७.२० टक्के गुण प्राप्त करून मराठी माध्यमाच्या सरस्वती विद्या मंदिर शाळेतून तृतीय क्रमांक पटकावून घवघवीश यश प्राप्त केले.आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत यशने धावण्याच्या शर्यतीत बक्षिसे मिळविली ! सत्कार संयोजक जळगाव सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी अवांतर वाचन हे शालेय गुणवत्ता व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला आमरण पुरक असते असे सत्कारावेळी अनौपचारिक मार्गदर्शनात सांगितले.पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी दोघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.सत्काराप्रसंगी यशचे पिताश्री ॲडव्होकेट संतोष सांगोळकर,पियुष मेथाळकर कुटुंबिय उपस्थित होते.