• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदर किशोर दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी.

Jun 3, 2024

Loading

मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदर किशोरभाऊ दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी शिक्षकांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर, कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटिल उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत व गृहराज्य व शालेय शिक्षणराज्य मंत्री शुंभराजे देसाई आणि नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय किशोरभाऊ दराडे मुख्याध्यापक संघ व टीडीएफ पदाधिकारी यांच्या उपस्थितित दुपारी 2:15ते 4:15 या वेळेत मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली 2005 पूर्वी नियुक्त पण 100% 2005 नंतर झालेल्या लोकांना जुनी पेंशन लागू करण्यास मा एकनाथजी शिंदे पूर्णपणे सकारत्मक असून आचारसंहिता संपताच काही दिवसात हा प्रश्न निकाली लागणार त्यानंतर 20%40%टप्पा वाढ ही नैसर्गिक पद्धतीने नियमित पणे देण्याचे मान्य तसेच आदिवाशी आश्रम शाळेचे पगार नियमित व त्यांची वेळ येत्या जून पासून 11 ते 5 होणार, विनाअनुदानित वरुन अनुदानित वर बदली व मान्यता आणि शालर्थ आयडी ऑनलाइन करणार आश्रम शाळेचा ग्रेड पे सातव्या वेतन आयोगा नुसार 4400 वरुन 4800 वर करण्याचे परिपत्रक आजच निर्गमित
सर्व अनुदानित शाळा व आश्रम शाळाना कला व क्रीड़ा शिक्षकांची पदे भरण्यास त्वरित मान्य केले
7व्या वेतन आयोग नुसार वेतनेत्तर अनुदान देण्यास मुख्यमंत्री अनुकूल यावेळी टीडीएफ चे नाशिक विभाग कोषाध्यक्ष मोहन चकोर , नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी देशमुख ,जुनी पेंशन नेते दिगंबर नारायणे , अशोकराव सोमवंशी ,अमरावती विभागाच्या संगीताताई शिंदे,महेंद्र हिंगे, उपाध्यक्ष ,प्रदीप सांगळे ,बी.के.नागरे , दिनेश देवरे ,माधुरी मेटेंगे,बंडू मखरे,सुदर्शनाताई त्रिगुणाईत , संभाजी पाटील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आदी नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणात यावेळी बैठकीला मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *