बैठक सफल- आचारसंहिता संपताच 2005 पूर्वीच्या पेंशनचा प्रश्न निकाली निघणार, टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीनेच होणार, शैक्षणिक सत्र 2024-25 पासून आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 अशी पूर्ववत होणार- मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आश्वासन
शिक्षक आमदार किशोर दराडे साहेब, डॉ.सौ.संगीताताई शिंदे (बोंडे) व संघटनांचे प्रतिनिधी यांची मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत आज वर्षा निवासस्थानी विशेष बैठक संपन्न

मंत्री महोदयांची उपस्थिती- शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर, कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटिल, उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत व शालेय शिक्षण राज्यमंत्री शंभूराज देसाई उपस्थित
बैठकीतील आणखी विषय – वेतनेत्तर अनुदान, आश्रमशाळांना कला व क्रीडा शिक्षकांची मान्यता, विना अनुदानित वरून अनुदानित वर बदली तसेच मान्यता शालार्थ आय डी ऑनलाइन होणार, आश्रमशाळा शिक्षकांचे पगार नियमित करण्याचे आश्वासन व मंत्री महोदयांचीही सहमती
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
मुंबई दि.3 जून 2024
निवडणूक आचारसंहिता संपताच 2005 पूर्वीचा पेंशनचा प्रश्न,
नैसर्गिक पद्धतीने टप्पा वाढ, आश्रमशाळा शिक्षकांचे नियमित पगार व शैक्षणिक सत्र 2024-25 पासून राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेची वेळ पुनश्च 11 ते 5 च होणार, त्याचप्रमाणे आश्रमशाळांना कला, क्रीडा शिक्षक पदभरतीसाठी मान्यता मिळणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले आहे. आचारसंहिता संपताच हे प्रश्न निकाली निघणार आहेत.
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार श्री. किशोर दराडे साहेब, शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सौ.संगीताताई शिंदे(बोंडे) , शिक्षक नेते श्री.मोहन चकोर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.एस बी देशमुख, जुनी पेंशन नेते नारायण राणे सर यांच्यासह संघटनांच्या प्रतिनिधींची आज मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. या विशेष बैठकीस श्री.अशोकराव सोमवंशी सर, जुनी पेंशन राज्य सचिव श्री.महेंद्र हिंगे सर, श्री.प्रदीप सांगळे सर,श्री.मिथुन डोंगरे, श्री.बंडू माखरे, श्री.छबुराव फुंदे, श्री.बी.के.नागरे सर,श्री. दिनेश सर,मुंबईच्या सौ. माधुरीताई मेटांगे, श्रीमती सुदर्शनाताई त्रिगुणाईत मॅडम सुद्धा बैठकीला उपस्थित होत्या.
शिक्षकांच्या प्रश्नांवर लगेच तोडगा काढता यावा यासाठी या बैठकीस शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर, कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटिल उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले होते.
आज दुपारी 2.15 ते 4.15 अशा तब्बल 2 तास बैठकीमध्ये शिक्षणक्षेत्रातील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा पार पडली.या बैठकीमध्ये वर उल्लेखित केलेल्या निर्णयासोबतच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनेत्तर अनुदान देण्यास अनुकूलता, आश्रमशाळांना कला व क्रीडा शिक्षकांची मान्यता, विना अनुदानित वरून अनुदानित वर बदली तसेच मान्यता शालार्थ आय डी ऑनलाइन होणार, आश्रमशाळा शिक्षकांचे पगार नियमित करण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 4400 वरून 4800 वर करण्याचे परिपत्रक सुद्धा आजच निर्गमित करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आपला विश्वासू
महेंद्र हिंगे
शिक्षण संघर्ष संघटना
महाराष्ट्र राज्य