पीएसआय ची परीक्षा पास झालेला गुलाबराव सनेर याची मामाच्या गावाला घोड्यावर मिरवणूक


पीएसआय ची परीक्षा पास झालेला गुलाबराव सनेर याची मामाच्या गावाला घोड्यावर मिरवणूक
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
चोपडा तालुक्यातील हातेड बु येथील तरुण परीक्षित गुलाबराव सनेर हा पीएसआय ची परीक्षा पास झाल्याबद्दल त्याच्या मामांचे गाव शिरूड ता.अमळनेर येथे घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव पाटील तर
प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी सुनील नंदवालकर,पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, शेतकरी संघाचे माजी संचालक महेंद्र पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विजयसिंह पवार, उमेश काटे,सौ योजना पाटील या होत्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचलन मिलिंद पाटील यांनी केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
परीक्षित सनेर याने पीएसआय परीक्षा पास झाल्या पर्यंतचा प्रवास सांगून तरुणांनी ध्येय, कष्ट,संयम, सातत्य ठेवले तर निश्चितपणे यश मिळेल असा संदेश दिला.
स्पर्धा परीक्षा विजयसिंह पवार,उमेश काटे यांनी आपल्या भाषणातुन तरुणांना मार्गदर्शन केले.
श्याम अहिरे यांनी तरुणांनी अशा आदर्शवत कार्यक्रमाचा लाभ जास्तीतजास्त घ्यावा. असे सांगितले.
डीवायएसपी सुनील नंदवालकर यांनी सांगितले की आतापर्यंत भाचा नवरदेव असेल तर त्याची गावातून घोड्यावर मिरवणूक मामा-मामी काढत असतात परंतु स्पर्धा परीक्षा पास झाल्या मुळे अशी मिरवणूक शिरूडला काढणे हे विशेष आहे. शिरूडस्पर्धा परीक्षा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन,नियमित वाचन व व्यायाम आणि हे करीत असताना मोबाईलचा कमीतकमी वापर करावा. असे सांगितले. दरम्यान पीएसआय परीक्षित सनेर व त्याचे वडील- गुलाबराव सनेर, आई- सौ कल्पना यांचा सत्कार गावकऱ्यांतर्फे करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी आपल्या भाषणातून परीक्षित यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचा आदर्श ठेवावा असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी सरपंच गोविंदा सोनवणे, ग्रा. प.सदस्य नरेंद्र पाटील,दिलीप रतन पाटील,पोलिस पाटील विश्वास महाजन,चंद्रकांत पाटील,मनीलाल पाटील , सौ.ज्ञानेश्वरी पाटील,रोहन पाटील आदी मंडळी उपस्थित होती.