पिक विमा व शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान काँग्रेसची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी


पिक विमा व शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान काँग्रेसची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खालील मागण्या लवकरात लवकर मंजूर करून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढा. खरीप हंगाम 2023- 24 मध्ये ज्या महसूल मंडळात पावसाचा खंड पडून दुष्काळ पडला अशा मंडळांना उर्वरित 75% पीक विमा लवकरात लवकर मिळावा.. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ तसेच रोगराईमुळे शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. सदरहू शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली होती त्या अनुषंगाने सदरील पिक विमा कंपनीने पंचनामे देखील केलेले होते तरी अशा शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर पिक विमा मिळावा.
सन 2023 मध्ये जिल्ह्यातील सर्वच मंडळाकडे तापमान 45 डिग्री पेक्षा जास्त झाल्याने जिल्ह्यातील फळ बागायतदार केळी शेतकऱ्यांना हवामान आधारित पिक विमा लवकरात लवकर मिळावा.. अमळनेर तालुक्यातील 8 ही मंडळात 2021 -22 मध्ये अतिवृष्टी अवकाळी व गुलाबी वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावून घेतला गेला होता . शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देऊ अशी घोषणा ऐवजी होती.. परंतु आजतायत वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तरी आपल्या स्तरावरून लवकरात लवकर लक्ष देऊन सदर शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना
सरकारने जाहीर केले प्रमाणे हेक्टरी अनुदान मिळावे.
मागील महीन्यात झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे अनुदान लवकरात लवकर मिळावे..
वरील सर्व मागण्याची निवेदन तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर देण्यात आले आहे. तरी आता आपण स्वतः लक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.15 दिवसाच्या आत न्याय मिळवून न दिल्यास किसान काग्रेस च्या वतीने आंदोलन केले जाईल असे पत्रकात राष्ट्रीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा सुभाष सुकलाल पाटील, राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील, माननीय सभापती पंचायत समिती अमळनेर धनगर दला पाटील, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील अनिल शिंदे, राष्ट्रीय किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे..