पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हेरे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची उपस्थिती



आज पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हेरे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी माननीय विकास पाटील शिक्षणाधिकारी व माननीय नरेंद्र चौधरी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे उपस्थित होते
सुरुवातीला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना घोड्यावर व गाडीवर बसून फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत गावातील सरपंच ,उपसरपंच ,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी,केंद्रप्रमुख संजय पाटील,शाळेचे मुख्याध्यापक हेमंत अहिरराव सर शिक्षक प्रवीण बोरसे,मनोहर पाटील,गुजराथी सर,पुरुष व महिला पालक व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला.त्यानंतर शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ,चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.शालेय पोषण आहार मध्ये मिष्टान्न भोजन देण्यात आले. पालकांनी आपल्या मुलाना शाळेत रोज पाठवून गुणवत्ता वाढवण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळा कन्हेरे ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात तालुक्यातून प्रथम आल्याने समस्त ग्रामस्थांचे व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
पारोळा तालुक्यात वंजारी बु गावात ट्रॅक्टर वर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली, धाबे शाळेत मोटार गाडीवर तसेच मोंढlले पिंपरी येथे उंट गाडीवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना घोड्यावर बसून बैलगाडीवर बसून उंटगाडीवर बसून प्रभात फेरी काढून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.अशा प्रकारे आज शाळेचा प्रथम दिवशी शाळा प्रवेशोत्सव तालुक्यातील 117 शाळा मध्ये साजरा करण्यात आला.