पाठशाळेचा पहिला दिवस …उत्साह पूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाने झाला शुभारंभ


पाठशाळेचा पहिला दिवस …
उत्साह पूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाने झाला शुभारंभ
अमळनेर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या पहिल्या दिवशी अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे विविध आयोजित उपक्रमांनी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण मंदिर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री एस. डी. चौधरी सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. ललित नेमाडे सर तसेच पालक देखील उपस्थित होते. पताके व फुगे यांनी सजवलेल्या वर्गात व रांगोळी काढून सजवलेल्या अंगणात प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून ड्रम ढोल च्या आवाजात तसेच चॉकलेट,कागदी बुके व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे टाकाऊतून टिकाऊ अशी सेल्फी बुथ होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना गोड अल्पोपहार देण्यात आला.
नवागतांचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्री. चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.शाळेतील उपशिक्षिका श्रीमती. स्नेहल प्रकाश ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा धांडे,योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, उमेश चौधरी, ज्योती इंगळे, किशोर सरोदे या सर्वांचे सहकार्य लाभले.