महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे झाले स्वागत…
महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे झाले स्वागत…
अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये आज 15 जून 2024 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले..
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एक दिवस अगोदर मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गावातील पालकांच्या भेटी घेतल्या..
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली..दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांं श्वेता बैसाणे, वैष्णवी माळी,जयश्री पाटील यांचा सत्कार व


अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, जिल्हा परीषद शिक्षक पालक
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील,सदस्य सुकलाल पाटील, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील उपस्थित होते..