शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 15 जून रोजी सन 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ शाळा प्रवेशोस्तव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीस शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती देवता, स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पांजली अपर्ण करण्यात आली.या प्रसंगी या वर्षी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन व चंदनाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले.या प्रसंगी शालेय प्राथर्ना व राष्ट्रगीत ,शालेय गीत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रशांत जगताप यांनी केले.या वेळेस पर्यवेक्षक श्री.गणेश महाजन,सौ. वर्षा ढेपे,श्रीमती राजश्री कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव सौ.मीराताई गाडगीळ,समंवयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.या वेळेस इ.5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत क्रमिक पाठ्यपुस्तकांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. संस्थेच्या सहसचिव सौ.मीराताई गाडगीळ यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षात सर्व उपक्रमात सहभागी होऊन शाळेचा नावलौकीक टिकविण्याचे आवाहन केले.या प्रसंगी महत्वाच्या शालेय सूचना प्रभारी मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांनी दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेवती किंहिकर यांनी तर आभारप्रदर्शन सौ. वर्षा ढेपे यांनी केले.शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.श्रीमती संपदा छापेकर यांनी वंदेमातरम गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.