


प्रताप कॉलेजचा वर्धापन दिन संपन्न
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर चा 79 वा वर्धापनदिन 20 जून रोजी दुपारी 12:15 वाजता संपन्न झाला.श्रीमंत,दानशूर,कर्मयोगी प्रताप शेठजी यांनी खानदेश भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन खानदेश शिक्षण मंडळाची स्थापना केली.गरीबांसाठी रुग्णालय,अध्यात्मिक श्रद्धे करिता श्रीराम मंदिर,वैचारीक चिकित्सा व संशोधनासाठी प्रताप तत्वज्ञान केंद्र यासह 20 जून 1945 रोजी प्रताप महाविद्यालयाची स्थापना केली.या नामांकित संस्थेत वाराणसी,नागपूर,पुणे,औरंगाबाद, अहमदनगर अशा विविध ठिकाणाहून आलेल्या तज्ञ प्राचार्य व अनुभवी शिक्षकांनी उत्तम सेवा दिली.या संस्थेत यशाची उज्वल परंपरा आजही कायम आहे.गुणवत्ता टिकविणे हे सूत्र कार्याच्या केंद्रस्थानी आहे.प्रताप महाविद्यालयास आज 79 वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून खा.शि.मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी यांनी दानशूर प्रताप शेठजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले तर जेष्ठ संचालक अण्णासाहेब हरी भिका वाणी,विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे यांनी श्रीमती भागीरथीदेवी अग्रवाल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,जेष्ठ संचालक डॉ.अनिल शिंदे,योगेश मुंदडे,सीए.नीरज अग्रवाल,प्रदीप अग्रवाल,प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव यांनी प्रताप शेठजी व श्रीमती भागीरथीदेवी अग्रवाल यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.या प्रसंगी प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी कॉलेजची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून उपस्थित असणारे शिक्षक,शिक्षकेत्तर वृंद,विद्यार्थी यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.तदनंतर आमचे प्रताप महाविद्यालय हे गीत सर्वांना एकविण्यात आले.या वेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.पराग पाटील,प्रा.उल्हास मोरे,डॉ.विजय तुंटे, डॉ.अमित पाटील,डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही.बी.मांटे,डॉ.योगेश तोरवणे,क्रीडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.दिनेश भलकार,प्रा.दिनेश बोरसे,श्री.राकेश निळे,देवेंद्र कांबळे,भटू चौधरी, जयदेव पाटील आदींनी सहकार्य केले.