• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डॉ योगेश रघुनाथ महाजन यांची परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा महाराष्ट्र राज्य “नाशिक विभागातून एकमेव (धुळे,नंदुरबार,जळगाव) दिशा मॉडेल स्कूल” म्हणून निवड.

Jun 20, 2024

Loading

डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांची परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा महाराष्ट्र राज्य “नाशिक विभागातून एकमेव (धुळे,नंदुरबार,जळगाव) दिशा मॉडेल स्कूल” म्हणून निवड.

आज दि.20/06/2024 पारोळा येथील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई व आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे,NIMH सिकंदराबाद व जय वकिल फौंडेशन व रिसर्च सेंटर, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिशा अभ्यासक्रम 2023-24 यशस्वीपणे अंमलबजावणी केली त्याबद्दल नाशिक विभाग ” Disha implementing school 2023-24 “प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.नाशिक विभागातून एकमेव परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळेची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्यातून 174 शाळा दिशा अभ्यासक्रम अंमलबजावणी शाळांची निवड करण्यात आली होती.बौध्दिक अक्षम प्रवर्गातील विशेष शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो.डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांचा प्रशस्तीपत्र व सत्कार श्री. मानसिंग पावरा साहेब वैसाका, धुळे जि प दिव्यांग कल्याण विभाग,श्री.सुनील वाघ साहेब संस्थापक अध्यक्ष यमुनाई शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळ संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह, श्रीमती शुभांगी देसाई मॅडम,दिशा अभियान प्रमुख, यांचे हस्ते देण्यात आले.समवेत शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव, उपमुख्याध्यापक हेमंत महाजन, जगदिश सोनवणे विशेष शिक्षक, कुणाल महाजन तसेच स्नेहल बाईत ,कोकण विभाग समन्वयक, जयपाल राठोड, नाशिक विभाग समन्वयक, आकाश पाटील नाशिक विभाग समन्वयक तसेच धुळे,जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील मुख्याध्यापक व विशेष शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *