• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नासिक विभागात…

Jun 22, 2024

Loading

शिक्षक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नासिक विभागात… नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आज नाशिक येथे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

नाशिक शहरातील ५०० शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक यांनी किशोर दराडे यांना पाठींबा जाहीर केला आहे. आमदारकीच्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न किशोर दराडे यांनी केला असून यावेळीही त्यांना प्रचंड बहुमताने नक्की विजयी करून आपला हक्काचा माणूस विधान परिषदेत पाठवावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन याप्रसंगी केले. राज्यातील महायुतीच्या सरकारने शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा दिला आहे. तसेच २००५ आधीच्या शिक्षकांना देखील न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू, तसेच शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना भेडसावणारे प्रश्न नक्की सोडवू असे आश्वासन दिले.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *