• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पी एम पोषण बाबत मनपा केंद्र प्रमुख यांची आढावा सभा संपन्न

Jun 24, 2024

Loading

जळगाव -येथील जळगाव शहर मनपा शिक्षण मंडळ कार्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना संदर्भात केंद्र प्रमुख आढावा सभा घेण्यात आली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक विजय पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रातील सर्व शाळांनी पी एम पोषण योजनेची ऑनलाईन हजेरी नियमित भरावी, शाळांना भेटी देऊन स्वच्छता व योजनेच्या अंमलबजावणी बाबत पाहणी करावी, शहरातील शाळांना परसबाग उपक्रम बाबत प्रोत्साहित करावे अशा सूचना देण्यात आल्या. सभेला केंद्र प्रमुख गंगाराम फेगडे, सचिन बोरसे, ईश्वर पाटील, कुर्बान तडवी, अशोक सैंदाणे, राजेंद्र राजपूत, नईम शेख, समाधान सोनवणे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी दीपाली पाटील, लिपिक गणेश चौधरी यांचे सहकार्य लाभले.