राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने डॉ.रवींद्र भोळे सन्मानित
उरुळी कांचन: येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक व वैद्यकीय क्षेत्रात तीन तपापासून समर्पित भावनेने वैद्यकिय क्षेत्रांत कार्य करणारे ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना नुकतेच मान्यवरांच्या हस्ते स्मृतींचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुष्य देउन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मत व्यक्त करताना वरिष्ठ उपाध्यक्ष बिजेपी सुनील अंकुश तुपे म्हणाले की डॉ.रवींद्र भोळे यांनी मराठवाडा भूकंपामध्ये अहोरात्र कार्य केलेले आहे. पद्मश्री डॉ. मनीभाईजींच्या सानिध्यात राहून त्यांनी उरुळी कांचन येथे गॅस्ट्रो साथीमध्ये मध्ये सुद्धा महान कार्य केलेले आहे. तसेच कोरोना पांडेमिक मध्ये 24 तास वैद्यकीय सेवा दिलेली आहे. पुरंदर तालुक्यातील पूर्व भागात पंचक्रोशीत अनेक वर्ष दुष्काळग्रस्त भागात ग्रामीण वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात दिलेली आहे. डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन येथे डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा अनेक वर्षापासून देत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन ,प्रवचनाद्वारे प्रबोधन ,आरोग्य शिबिरे, हृदयरोग्याना अर्थिक यांना आर्थिक मदत मिळवून देणे, असे अनेक वैद्यकीय उपक्रम राबविलेले आहेत. उरुळी कांचन येथील प्रायमरी हेल्थ सेंटरच्या रुग्णकल्याण समितीद्वारे सदस्य म्हणून कार्य केलेले असून,त्यांनी स्वाइन फ्लू मोहीम ,डेंग्यू रॅडिकेशन मोहीम, कुष्ठरोगदु रीकरण मोहीम त्,याचप्रमाणे पल्स पोलिओ मोहीम , उदिसा अंतर्गत बालकांचे तपासणी कार्ये, कुपोषण मोहीम अशा अनेक शासनाच्या योजना परिश्रम घेऊन राबविल्या आहेत. पुणे जिल्हा शैक्षणिक संशोधन समितीच्या माध्यमातून सदस्य या नात्याने त्यांनी अनेक शाळा ,कॉलेजमध्ये आरोग्य विषयी व्याख्याने दिलेली आहेत. पद्मश्री डॉक्टर मणी देसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक आरोग्य विषयक उपक्रम हार्ट कॅम्प ,युरिनरी कॅम्प ब्लड कॅम्प ,ऑर्थो कॅम्प इत्यादी अनेक शिबिरे आयोजित करण्यात केलेली आहेत. डॉ. रवींद्र भोळे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य व ग्रामीण रुग्णसेवा उल्लेखनीय आहे असे मत सुनील तुपे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नंदकुमार काशिनाथ मुरकुटे माजी अध्यक्ष हवेली तालुका महानुभाव परिषद, बाळासाहेब कानकाटे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सुरेश मस्के, सामाजिक कार्यकर्ते, अमोल भोसले पत्रकार दैनिक केसरी उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर डे निमित्ताने डॉ. रवींद्र भोळे यांना राज्यभरातून व राष्ट्रीय पातळीवरून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.