ज्येष्ठ समाजसुधारक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना हिंदु रत्न हार्ट अवार्ड प्रदान
बेंगलोर: समर्पित भावनेने विविध सामाजिक रचनात्मक क्षेत्रात निष्काम कार्य करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ,प्रवचनकार ह.भ.प डॉ.रवींद्र भोळे यांना नुकताच ‘हिंदू रत्न हार्ट अवार्ड’ बेंगलोर येथे प्रदान करण्यात आला. गोल्डन केअर क्लब चें संस्थापक अध्यक्ष के. सुधाकर यांनी पुरस्कार प्रदान केला. महादेवपुरा बेंगलोर येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ समाज सुधारक , प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी सामाजिक ,धार्मिक, वैद्यकीय ,निराधार सेवा, अध्यात्मिक,अपंग इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून योगदान दिलेले आहे.मूकबधिर ,मतिमंद सेवा, ग्रामस्वच्छता अभियान कार्य, विविध आरोग्य विषयक जनजागृती मोहीम, अनेक आरोग्य शिबिरे,,नैसर्गिक आपत्ती मदत कार्य , मराठवाडा भूकंपात कार्य, दुष्काळग्रस्त भागात वैद्यकीय सेवा,वृक्षारोपण पर्यावरण कार्य , तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी रचनात्मक उपक्रम राबविले आहेत. अनेक संस्थांचे पदाधिकारी असून उरुळी कांचन डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे त्यांनी विविध कॉलेज शाळांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. एन वाय के च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यभर अनेक संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रासाठी विशेष योगदान दिलेले असून राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रहितासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. डॉ. रवींद्र भोळे यांना वरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.