अमळनेर तालुक्यात वाजवायची असेल तुतारी..
कृषीभूषण साहेबराव पाटलांना द्यावी उमेदवारी..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेर तालुक्यासाठी काही ठोस काम करून कायमस्वरूपी ते जनतेच्या हृदयातले आमदार आहेत, हे तेवढेच सत्य आहे.. अमळनेर तालुक्यातील काही नागरिकांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .या पत्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तालुक्याचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना उमेदवारी द्यावी.. 2009 ला साहेबराव पाटील अपक्ष निवडून आले व ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहयोगी सदस्य झाले.. त्यांना अजित पवार यांनी मंत्री पदाची खुली संधी उपलब्ध करून दिली होती पण ती संधी नाकारून त्यांनी तालुक्याचा जीवन मरणाचा प्रश्न निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण यासाठी हवा तेवढा निधी द्यावा याची मागणी केली व त्यासोबत न भूतो न भविष्यती इतका निधी आणून त्यांनी तालुक्याचा विकास केला.. 2017 ला त्यांनी विदयामान ना. अनिल पाटील यांना भाजपातून राष्ट्रवादीत आणले व 2019 ला स्वतःची उमेदवारी त्यांना दिली पण आता चित्र वेगळे आहे.. नामदार अनिल पाटील अजित पवार गटात असून त्यांच्या विरोधात तुम्ही साहेबराव पाटलांना उमेदवारी द्यावी अशी विनंती पत्रात केली आहे..
पूर्ण तालुका साहेबराव पाटलांना निवडून आणण्यासाठी कायम तत्पर राहील असे अंमळनेर तालुक्यातील नागरिकांनी एका पत्रकार द्वारे शरचंद्र पवार यांच्याकडे मागणी केली आहे…