प्रतिपंढरपूर डाळिंब बन येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
उरुळी कांचन,(प्रतिनिधी) : शेतीच्या पाण्यासाठीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. ‘पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहच दे’ चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. जीवनात सुख समृद्धी येऊ दे हे मागण बळीराजासाठी आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वाचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र डाळिंब विठ्ठल बन मधील पांडुरंगाकडे केली असल्याचे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. आषाढी एकादशीनिमित्त डाळिंब बन (ता. दौंड) येथील प्रतिपंढरपूर असणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात फुलून गेला. श्री विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरातील गाभारा आकर्षक फुलांची आरास करून सजविण्यात आला होता. आषाढी एकादशी निमित्त पहाटे चार वाजता काकड आरती करण्यात आली. तर, पहाटे पाच वाजता गावामधून श्री विठ्ठलाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर पालखी मंदिरात आणून श्री विठ्ठल मूर्ती प्रस्थापित करण्यात आली. त्यानंतर गाभाऱ्यातील श्री विठ्ठल मूर्तीला पंचामृताने स्नान घालण्यात आले. श्री विठ्ठल मूर्तीला वेशभूषा करून विविध प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आले. त्यानंतर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार राहुल कुल , राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या वैशाली नागवडे, श्री विठ्ठल बन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष नानासाहेब म्हस्के, कार्याध्यक्ष ज्ञानोबा कांचन, सरपंच बजरंग म्हस्के, उपसरपंच सर्जेराव म्हस्के, नंदकुमार म्हस्के, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, मा.पंचायत समिती सदस्य किसन म्हस्के, जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ. रवींद्र भोळे, सरपंच अमितबाबा कांचन, भाऊसाहेब कांचन, तहसीलदार अरुण शेलार, जिल्हा नियोजन समिती मा.सदस्य संतोष कांचन, रामदास चौधरी, नितिन दोरगे, पूर्व हवेली तालुका दैनिक सकाळ च्या पत्रकार सुवर्णा कांचन, दैनिक केसरी प्रतिनिधी अमोल भोसले, सुशांत दरेकर, लक्ष्मण केसकर, मोहन म्हेत्रे, लक्ष्मण म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, ज्ञानदेव म्हस्के, विठ्ठल म्हस्के, अशोक गायकवाड, उत्तम म्हस्के, दत्तू म्हस्के, अरुण म्हस्के, ऋषिकेश भाले, सुनिल गोते, उमेश म्हेत्रे, देविदास म्हस्के, सुधीर म्हस्के, अनिल धिवार आदी मान्यवर उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विविध गावांतील भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक पहाटे पासूनच डाळिंब बन येथे दाखल झाले होते. नियमांचे पालन करून भाविकांनी रांगेत उभे राहून विठुरायाचे दर्शन घेतले. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून देवस्थानला २ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी माहिती दिली आपल्या प्रास्ताविक मध्ये तर एल बी म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी म्हस्के यांनी आभार मानले.