
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहाचा शुभारंभ
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहाचा शुभारंभ
अमळनेर प्रतिनिधी
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीत *शिक्षण सप्ताह* साजरा करावयाचा आहे. या उपक्रमांतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती (TLM) करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी निर्माण केलेल्या साहित्य प्रदर्शनीचे उद्घाटन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सचिव सन्माननीय श्री संदीप घोरपडे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हेमकांत पाटील शालेय समिती अध्यक्ष नानासो अॅड.अशोक बाविस्कर शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील यांनी केले सदर प्रसंगी लोक न्यूज चे संपादक श्री संभाजी देवरे उपस्थित होते. शाळेतील शिक्षक श्री मनीष उघडे यांनी अध्यापन साहित्य निर्मिती केली. विद्यार्थी शिक्षक पालक धोरण करते व भागधारक यांचा सहकार्याने टिचिंगलर्निंग मॉडेल्स निर्मिती मुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता विकसित होते विद्यार्थ्यांना नवनिर्मिती आनंद मिळतो विद्यार्थ्यऻमध्ये समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित करणे ही नवीन शैक्षणिक धोरणाची मुख्य उद्दिष्ट सदर उपक्रमातून साध्य करण्याचा उत्तम प्रयत्न होताना दिसून आला. मराठी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास ,भूगोल या विषयांच्या विविधता पूर्ण प्रतिकृती निर्मितीसाठी श्रीमती विद्या पाटील श्री देवेंद्र पाटील श्री डि के पाटील सौ विद्या पाटील श्री मनीष उघडे श्री समाधान पाटील श्री देवेंद्र महाजन श्रीमती शारदा उंबरकर श्रीमती मीना धनगर श्रीमती वैशाली महाजन श्री हर्षल पवार श्री जयेश मासरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .