
माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
“माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणुसकीची प्रेरणा आणि समाजभानाची जाणीव असते, हे पुन्हा एकदा अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) दाखवून दिले आहे.
तालुक्यातील ३० गरजू, होतकरू आणि अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना यावर्षीसुद्धा PTA क्लासेसने शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत नसून, ‘आपलेपणाने आयुष्य उजळवण्याची एक जबाबदारी’ PTA शिक्षकांनी स्वेच्छेने स्वीकारली आहे.
या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण पित्याचे छत्र हरवलेले अनाथ आहेत. काहींना दोन वेळचं अन्नसुद्धा उपलब्ध नसताना, त्यांनी शिकायचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न PTA ने आपल्या कर्तव्याने हातात घेतले.
या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर विनामूल्य क्लासेस, पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा मा. नितीन मुंडावरे साहेब (उपविभागीय अधिकारी, अमळनेर) यांच्या कार्यालयात PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांच्या हस्ते करण्यात आली.
तसेच, दरवर्षी ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना PTA मार्फत त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार फीमध्ये सवलत दिली जाते, ही एक सामाजिक बांधिलकीची उदाहरणं ठरली आहेत.
उपविभागीय अधिकारी मा. मुंडावरे साहेबांनी या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक करत, भविष्यात शासनस्तरावरून अशा कार्यांना प्रोत्साहन मिळावे, अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमास PTA चे मान्यवर सदस्य उपस्थित होते:
भैय्यासाहेब मगर सर (अध्यक्ष), आयकेडी अँकेडमीचे संचालक प्रा किरण माळी सर, राकेश बडगुजर सर, सुरश्री वैद्य मॅडम, सुधीर टाकणे सर, सोनल जोशी मॅडम, वैशाली निकम मॅडम, शिरीष डहाळे सर, शेखर कुलकर्णी सर, हर्षल बडगुजर सर, आरिफ पिंजारी सर, ज्ञानेश्वर मराठे सर, स्वर्णदिप राजपूत सर व इतर समर्पित शिक्षक.
आज PTA क्लासेस संघटनेच्या या उपक्रमामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की –”शिक्षण म्हणजे व्यवसाय नव्हे, तर समाजसेवेची पवित्र प्रक्रिया आहे!”