
कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼
🌼 कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼
अमळनेर प्रतिनिधी:
श्रीक्षेत्र कळमसरे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २३ जुलै २०२५, बुधवार रोजी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ७ ते ९ या वेळेत पालखी सोहळ्याने होणार आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण गाव हरिभक्तीत रंगणार आहे.
यानंतर दुपारी ११ ते २ या वेळेत महाप्रसाद भाविकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जयेशजी महाराज वाघाडीकर यांचे श्रीहरी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या भक्तिमय पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आबासाहेब ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांनी केले आहे.
आयोजक:
श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळ, कळमसरे (ता. अमळनेर, जि. जळगाव)
🔔 राम कृष्ण हरी… राम कृष्ण हरी… 🔔