• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राम्हणवेल विद्यालयाचे यश “

Jul 25, 2024

Loading

“पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राम्हणवेल विद्यालयाचे यश ”

साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै .बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीचे ७ विद्यार्थी व इयत्ता आठवी चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले होते . या पैकी प्रत्येकी एक – एक विदयार्थी यशस्वी ठरले . या इ ५ वी चा किशोर रतन सोनवणे ( भोरटीपाडा ) व इ ८ वी ची भूमेश्वरी रतिलाल गायकवाड हे पात्र झालीत . या यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थाध्यक्ष नानासाहेब तुकाराम महाजन , संस्था सचिव काकासाहेब एकनाथ महाजन ‘ संचालक मंडळ ‘ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गणेश माळी ‘ शिष्यवृत्ती समिती प्रमुख श्री काशिनाथ माळी ‘ श्री हिरामण सोनवणे आणि श्री . बन्सिलाल माळी ‘ श्री . बी एस निकुंभ’ . श्री रविंद्र सुर्यवंशी , श्रीमती वर्षा गवळी सह लिपीक श्री चेतन महाजन ‘ बापू बोरसे , पंडीत खैरनार ‘ सुनिल ठाकरे व ग्रामस्थ व पालक यांनीही अभिनंदन केले .🌹🌹🌷🌷💐💐☘️☘️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *