मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न.
आज रविवार दि.२८जुलै,२४ रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता समाज कार्यालयात योजिलेल्या मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळाची बैठक श्री.दीपक मुरलीधर पवार,सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरवातीला संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची पुजा करून माल्यार्पण करण्यात आले.त्या नंतर समाज मंडळ तर्फे आयोजित गणेशोत्सवाचे तीसरे वर्ष व समाज कार्यालय परिसरात दुरुस्तीसह विविध विषयांवर चर्चा झाली. सदर बैठकीस मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्री.विजय पवार, श्री.सतिष मुंडके, श्री.मधुकर दहिवाळ,सर, श्री.अनिल चव्हाण,श्री.धिरज विंचूर, श्री.गिरीष सराफ,श्री.मनोज माळवे,कुणाल दहिवाळ, विलास कुळथे, तुषार कुळथे व हिमांशु कुळथे व पदाधिकारी उपस्थित होते.