भुसावळ तालुका शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न .
ताप्ती पब्लिक स्कूल विजयी तर सेंट अलाॅयसेस हायस्कूल उपविजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय १७ वर्षा आतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावरती उत्साहात संपन्न झाल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे होते स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ व क्रीडांगण पूजन करून रोनक बियाणी यांनी केले. सदाप्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, भुसावळ तालुका समन्वयक डॉ प्रदीप साखरे , तांत्रिक समिती सदस्य मेघाशन शिंदे, आर. आर. धनगर , हिम्मत पाटील, यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते भुसावळ तालुक्यातील नऊ शाळांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला यात प्रथम सेमी फायनल सामना सेंटअलाॅयसेस स्कूल भुसावळ विरुद्ध एम आय तेली स्कूल भुसावळ यांच्यात झाला यात सेंट अलाॅयसेस स्कूल ४/० गुणांनी विजयी झाले वा अंतिम सामन्यात पोहोचला दुसरा सेमी फायनल सामना बियाणी पब्लिक विरुद्ध ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ यांच्यात झाला यात ताप्ती पब्लिक स्कूल १/०ने विजयी होवून अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामना सेंटअलाॅयसेस स्कूल भुसावळ विरुद्ध. यांच्यात झाला अंतिम सामने च्या वेळी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले त्यांनी दोघ संघांना व त्यांच्या कोच व कर्णधार यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या व जिंकणाऱ्या संघाने जिल्ह्या व राज्य क्रीडा स्पर्धेत सुध्दा विजयी होऊन भुसावळ तालुक्याचे नांव व आपल्या शाळेचे नांव मोठे करावे विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या सामन्यात पेनल्टी शूट मध्ये ४/३ ने ताप्ती पब्लिक स्कूल चा संघ विजयी झाला. पंच म्हणून अनस शेख, रेहान शेख,, सादिक शेख आयान शेख, अलेस्टर सिमोंस, तोसिफ कुरेशी, हिम्मत पाटील ,यांनी काम पाहिले . स्पर्धेसाठी तांत्रिक सदस्य म्हणून समन्वय डॉक्टर प्रदीप साखरे, तांत्रिक सदस्य मेघश्याम शिंदे यांनी काम बघितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अर्जुन सणस, याकुब शेख, नम्रता गुरव, आयुब शेख सर यांच्यासह बियाणी मिलिटरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.