भुसावळ तालुका शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न .
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल , सेंट ऑलसेस हायस्कूल , पु.ओ. नहाटा महाविद्यालय विजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय १७ वर्षा आतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावरती उत्साहात संपन्न झाल्या प्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर स्पर्धेचे उद्घाटक तहसीलदार नीता लबडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व मामा बियाणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व क्रीडांगण पूजन करून श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. बियाणी एज्युकेशन संस्थेचे रोनक बियाणी , बियाणी मिलिटरी स्कूल चे प्राचार्य डी एम पाटील , महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, भुसावळ तालुका समन्वयक डॉ प्रदीप साखरे , तांत्रिक समिती सदस्य मेघाशन शिंदे, प्रा. मनोज वारके, हिम्मत पाटील, यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते. यात 14 वर्षातील मुलींचा अंतिम सामना डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध बियाणी पब्लिक स्कूल मिरगव्हान यांच्यात झाला यात डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल 2-0 ने विजयी झाले 17 वर्षाआतील मुलींचा सामना ताप्ती पब्लिक स्कूल विरुद्ध सेंटअलाॅयसेस हायस्कूल भुसावळ यांच्यात अटीतटीचा सामना झाला.यात सेंटअलाॅयसेस हायस्कूल0/1ने विजयी झाले . 19 वर्षे वयोगटातील सामना बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ विरुद्ध पु.ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ यांच्यात झाला या अटीतटीच्या सामन्यात अटीतटीच्या सामन्यांत पेनल्टी शूट वर 0/1ने नाहाटा महाविद्यालय विजयी झाले. पंच म्हणून अनस शेख, रेहान शेख,, सादिक शेख आयान शेख, अलेस्टर सिमोंस, तोसिफ कुरेशी, हिम्मत पाटील ,यांनी काम पाहिले . स्पर्धेसाठी तांत्रिक सदस्य म्हणून समन्वय डॉ. प्रदीप साखरे, तांत्रिक सदस्य मेघश्याम शिंदे यांनी काम बघितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अर्जुन सणस, याकुब शेख, यांच्यासह बियाणी मिलिटरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.