• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि. पवन देसले यांचे स्वागत ▪️कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; राजेंद्र वाघ

Aug 1, 2024

Loading

धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि. पवन देसले यांचे स्वागत

  1. ▪️कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; राजेंद्र वाघ

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : धरणगाव पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब यांचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.व्ही एस भोलाणे, तालुकाध्यक्ष धर्मराज मोरे, शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांसह उपस्थित पत्रकार बांधवांनी भारत देशाचा मूलाधार असलेले ‘भारतीय संविधान’ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तत्पूर्वी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य पी डी पाटील यांनी धरणगाव ग्रामीण व शहरातील सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचा परिचय करून दिला. यानंतर पो.नि. देसले साहेब यांनी सर्वांसोबत हितगुज करून परिचय जाणून घेतला तसेच सर्वांसोबत संवाद साधत दिलखुलास चर्चा केली. तसेच, आतापर्यंतच्या नोकरीतला प्रवास सर्व पत्रकारांसमोर मैत्रीच्या चर्चेतून मांडला. याप्रसंगी सतिष शिंदे व सुधाकर मोरे यांनी सांगितले की, आम्ही सर्व पत्रकार पोलिस प्रशासनाला सर्वोतपरी मदत करण्यास सदैव कटिबद्ध राहू. तसेच राजू बाविस्कर यांनी पत्रकार संघटनेच्या वतीने स्पष्ट केले की, आम्ही तालुका परिसरात सलोखा टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू व पोलिस प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करू. विकास पाटील यांनी सर्वांच्या वतीने देसले साहेबांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. सत्कारप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र रडे, राजेंद्र वाघ, विनोद रोकडे, निलेश पवार, आर डी महाजन, लक्ष्मण पाटील, अविनाश बाविस्कर, गणेश कोळी, ॲड. स्वप्निल भाटिया, ॲड. हर्षल चौहाण, शैलेश भाटिया, धनराज पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *