अमळनेरला २२ ते २४ ऑगस्ट २०२४
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह संपन्न होणार…
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी दिली माहिती..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरची मुलुख मैदान तोफ विधानसभेत अमळनेरचे ३ वेळा प्रतीनिधित्व ज्यांनी केले असे जनतेचे लाडके माजी आमदार साथी गुलाब बापू ज्यांना पूर्व व पश्चिम खान्देश “शिंगाड्यावाला शेतकरी नेता” म्हणून ओळखत असे. त्याचप्रमाचे शोध पत्रकारीतेत आपला वेगळा ठसा उमटविणारे (साथी संदेश) साप्ताहिक दैनिकांत रुपांतरीत करून लोकांना वर्तमानपत्र वाचनाची आवड लावणारे. आपल्या चौफेर वाचनाने साहित्य विश्वाला आपलेसे करणारे. शत्रूलाही शरण आल्यावर मरणदारातून परत आणणारे, अनेकांकडे आवडीने खायला जाणारे व आपल्याकडे त्यांना आदराने खाऊ घालणारे खवैय्या गुलाब बापू. आपल्या अचानक कृतीने राजकारणात खळबळ उडवणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील आज आपल्यात नाहीत. याला एक वर्ष होत आलंय, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्यालय बापूंच्या विविध गुणांना पुढील पिढी सोबत जोडण्यासाठी दरवर्षी
साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह
या कार्यक्रमाचे आयोजन करीत राहील.
दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी साने गुरुजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा ( लोकसहभाग) 0. १). सामाजिक पुरस्कार २) राजकीय ( पुरोगामी ) पुरस्कार वितरण करणार आहोत.
स्वरूप : २१०००/रोख स्मृती चिन्ह ( शिंगाडेधारी गुलाबराव ) लाल टोपी रुमाल ( बागायतदार )
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ( महाविद्यालयीन विद्यार्थी )
विषय : १. आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची… २. समाजवाद काल, आज, उद्या… ३. बोल की लब, आजाद हे तेरे ! ४. भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य… ५ खरा तो एकची धर्म…
स्वरूप: प्रथम ११०००/ , द्वितीय ९०००/ , तृतीय ७०००/ , उत्तेजनार्थ (२) प्रत्येकी २००० / विजेत्यांना आकर्षक स्मृती चिन्ह, व इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. वरील उपक्रमांसाठी तीनही प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
१. सामाजिक पुरस्कार निवड समिती
२. राजकीय ( पुरोगामी )निवड समिती
३. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन समिती
४. साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह आयोजन समिती
सोबतच या समारोहाच्या यशस्वीतेसाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कृपया या कार्यक्रमाच्या विचार पेरणीला ऐकण्यासाठी समाजातील विविध घटक उपस्थित राहावेत या कामी प्रचार व प्रसाराचे कार्य आपलया दैनिकातून होवो, हि रास्त अपेक्षा कारण या कार्यक्रमात वक्ते जी मांडणी करतील समाजहिताची, तरुणांना योग्य दिशेची, शेतकऱ्यांना आस भविष्याची. महिलांना खात्री सुरक्षिततेची, आणि एकूणच देशातील जनतेला प्रेरणा मिळेल संविधान बचावाची असे संदीप घोरपडे सचिव अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर जि. जळगाव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साने गुरुजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, साने गुरुजी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, साने गुरुजी कन्या हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक विलास चौधरी उपस्थित होते..